
तुमची त्वचाही उन्हामुळे काळी पडली असेल तर या घरगुती उपायांच्या मदतीने टॅनिंग काढता येऊ शकते.
उन्हामुळे त्वचा काळी पडलीय, टॅनिंग दूर करण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या
गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारे ऊन यामुळे स्किन टॅनिंग (Skin Tanning) होत चाललीय, या समस्येशी सर्वांना सामोरे जावे लागतेय. सूर्याच्या या तेजस्वी किरणांमुळे त्वचेला अनेक प्रकारे हानी पोहचते. प्रखर उन्हात आपली त्वचा निस्तेज आणि टॅन होऊ लागते. आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. परंतु जर तुम्ही उन्हात बराच वेळ राहिलात तर त्वचेत सनबर्न आणि अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत तुमची त्वचाही उन्हामुळे काळी पडली असेल तर या घरगुती उपायांच्या मदतीने टॅनिंग काढता येऊ शकते.
हेही वाचा: चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी वापरा टोमॅटो जेल
टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती उपाय
लिंबाचा वापर-
टॅनिंग काढून टाकण्यासाठी लिंबू ही एक प्रभावी गोष्ट आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतं आणि त्यात असणारं अॅसिड त्वचेच टॅनिंग काढून टाकण्यास मदत करतं.
काकडी आणि गुलाबपाणी-
आपण काकडी आणि गुलाबाच्या पाण्यातील फ्लॅक्स टॅन देखील काढू शकता. काकडीचा रस आणि गुलाबपाणी समप्रमाणात मिसळून कॉटन बॉलच्या मदतीने त्वचेवर लावा. काही वेळानंतर थंड पाण्याने त्वचा धुवा. यामुळे टॅनचा प्रभाव नाहीसा होईल.
हळद आणि बेसन-
हळद आणि बेसनचा पॅक त्वचेला एक्सफोलिएट करतो आणि टॅनिंग काढून टाकतो. यासाठी दोन चमचे बेसनात अर्धा चमचा हळद मिसळून टॅनिंग झालेल्या जागेवर लावू शकता. ते वाळल्यानंतर धुवून टाका.
हेही वाचा: टोमॅटोने चेहरा व शरीराची टॅनिंग होईल गायब; असा करा वापर
मध आणि पपई-
दोन टीस्पून पपई पेस्ट आणि एक चमचा मध घालून मिक्स करा. हे सुमारे 20 मिनिटे ठेवा.आता चेहरा नॉर्मल पाण्याने धुवा.टॅनिंग दूर होईल.
टोमॅटो आणि दही-
टोमॅटो आणि दहीचा पॅक त्वचेतून फ्लॅक्स टॅन काढून टाकतो आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करतो. दोन चमचे दहीमध्ये एक चमचा टोमॅटोचा रस घालून अर्ध्या तासानंतर चेहरा धुऊन घ्या.
हळद आणि दूध-
हळद आणि दूध समप्रमाणात मिसळून टॅनिंग झालेल्या स्कीनवर लावा. जर तुम्ही रोज याचा वापर केला तर काही दिवसांतच त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येईल.
अननस आणि मध-
अननस आणि मध या दोन्हींमध्ये आम्ल आढळते, जे मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. पेस्ट तयार करण्यासाठी दोन्ही एकत्र मिसळा आणि ते टॅनिंग झालेल्या जागेवर लावा. जर त्वचा संवेदनशील असेल तर पॅचची टेस्ट केल्यानंतरच ते लावा.
(टीप- या लेखातील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे.या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Web Title: Summer Skin Care Taning Skin Home Remedies
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..