Summer Holidays Tips: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना शिकवा 'या' गोष्टी; टीव्ही अन् मोबाईलपासून राहतील दूर

Summer Holidays Tips: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना शिकवा नवनवीन गोष्टी शिकवा. यामुळे मुले टीव्ही आणि मोबाईलपासून दूर राहतील.
Summer Holidays Tips
Summer Holidays TipsSakal

Summer Holidays Tips: मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आजी-आजोबांच्या घरी भेटायला जातात तर काही घरीच असतात. मे-जूनमध्ये तापमान इतके वाढते की उष्णतेमुळे लोक त्रस्त होतात. त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवत नाही. जेव्हा मुलं 24 तास घरीच असतात तेव्हा त्यांना टीव्ही आणि मोबाईल पाहण्याशिवाय पर्याय नसतो.

अशावेळी जर तुम्हाला तुमच्या मुलांना टीव्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना इतर सोप्या कामात व्यस्त ठेऊ शकता. ही कामे कोणती आहेत जाणून घेऊया.

संगित शिकवा

जर तुमच्या मुलाला संगीतात रस असेल, तर त्याला गायनाच्या क्लासला पाठवा. यातून त्यांच्यात दडलेले टॅलेंटही उघड होईल आणि त्याच वेळी मुलाला घरात राहून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

स्केटिंग

जर तुमच्या घराजवळ कुठेतरी स्केटिंग शाळा असेल तर तुमच्या मुलाला स्केटिंग शिकायला पाठवा. उन्हामुळे मुलांना नेहमी घरात ठेवणे आवश्यक नाही. तुम्ही त्यांना संध्याकाळी स्केटिंग शिकण्यासाठी पाठवू शकता.

पोहणे

उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये मुलांना पोहायला शिकवावे. यामुळे मुलांची उंची वही वाढेल आणि त्यांची शरीरिक उर्जा देखील वाढेल.

Summer Holidays Tips
Child Care Tips: लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या 'या' समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात मधुमेहाची लक्षणे

गिटार वाजवायाल शिकवा

आजकाल मुलांना गिटार वाजवायला आवडते. अशावेळी तुम्ही त्यांना गिटार शिकण्यासाठी क्लास लावून देऊ शकता. तुमच्या मुलाला गिटार वाजवायचे नसल्यास, तुम्ही त्याऐवजी त्यांचे आवडते वाद्य वाजवायला शिकण्यासाठी पाठवू शकता.

झाडे लावावी

या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या मुलासोबत झाडे लावू शकता. त्यांना झाडांशी बोलायला शिकवा आणि झाडांना पाणी द्यायला लावा. जेणेकरून ते स्वतः त्यांची काळजी घ्यायला शिकतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com