vegetable shopping mistakesSakal
लाइफस्टाइल
How To Buy Fresh Vegetables: उन्हाळ्यात भाज्या खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होतील खराब
fresh vegetable selection: उन्हाळा सुरू झाला की भाज्या,फळ लवकर खराब होतात. अशावेळी उन्हाळ्यात भाज्या खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
Tips For Buying Healthy Vegetables: मार्च महिना संपायला काहीच दिवस बाकी आहेत. तसेच उष्णतेची तीव्रता वाढत आहे. यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खरेदी करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात बाजारात भरपूर हिरव्या आणि ताज्या भाज्या मिळतात. यामध्ये वांगी, भेंडी, सिमला मिरची, टिंडा, दुधी भोपळा आणि भोपळा इत्यादींचा समावेश असतो. ज्याप्रमाणे स्वयंपाक करणे ही एक कला आहे असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे भाज्या खरेदी करणे ही देखील एक कला आहे. याबद्दल अनेकांना माहिती नसते.