Summer Wedding Tips : उन्हाळ्यात लग्न करणाऱ्या प्रत्येकीला ‘या’ गोष्टी माहिती असायलाच हव्यात ? नाहीतर वेडींग लुकचा उडेल फज्जा.!

Summer Wedding Tips : उन्हाळ्यात लग्न करताना वधुने काही गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे.
Summer Wedding Tips
Summer Wedding Tips esakal

Summer Wedding Tips : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. एका बाजूला कडक उन्हाळ्याला सुरूवात आणि याच दिवसांमध्ये वेडिंगचा सिझन देखील सुरू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. या मुहूर्तावर अनेक जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. लग्न म्हटले की, त्यामध्ये मग वधूचा मेकअप, आऊटफीट, ज्वेलरी, हेअरस्टाईल अस सर्वकाही आलं.

वधूला या सर्व गोष्टी हव्या तर असतातच शिवाय, यामध्ये तिला कम्फर्टेबल रहायचे देखील असते. परंतु, उन्हाळ्यातील लग्न म्हटले की, भावी वधूला एक प्रकारचे टेंन्शन येते. याचे कारण, म्हणजे तिला जड कपडे, ज्वेलरी, मेकअप कॅरी करायचा असतो.

वातावरणानुसार आणि कम्फर्टनुसार या गोष्टी ठरवल्या देखील जातात परंतु, उन्हामुळे, या गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, आज आम्ही वधूसाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या टिप्सच्या मदतीने वधू उन्हाळ्यातील लग्नात ही कम्फर्टेबल राहू शकेल.

Summer Wedding Tips
Wedding Fashion for Men’s : लग्नात मुले ही स्टाईल करू शकतात आईचा शालू, Wedding Look ला द्या इमोशनल टच

ओव्हर मेकअप करणे टाळा

ब्रायडल मेकअप करताना वधूने काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. जसे की, मेकअप जास्त ओव्हर होता कामा नये. मिनिमल आणि लाईट मेकअप करण्याचा प्रयत्न ठेवावा. यामुळे, लूक ही छान दिसेल आणि मेकअप नैसर्गिक वाटेल.

जर तुम्ही ओव्हर मेकअप केला तर ते दिसायला विचित्र दिसेल. त्यामुळे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाईट आणि नॅच्युरल मेकअप करण्याला वधूने प्राधान्य द्यावे. (Avoid over makeup)

वेडिंग आऊटफीटची घ्या खास काळजी

तुमचा वेडिंग आऊटफीट खरेदी करताना तो ट्रेंडनुसार असावा, याची खास काळजी घ्या. पेस्टल कलर्स आजकाल खूप ट्रेडिंगमध्ये आहेत. शिवाय, उन्हाळ्यातील लग्नामध्ये डार्क रंगाचे आऊटफीट परिधान करण्यापेक्षा वधूने पेस्टल रंगाच्या आऊटफीट्सची निवड करावी. जेणेकरून तुम्हाला या फिकट रंगामध्ये जास्त गरम होणार नाही.

वधूने फ्लोरल प्रिंटचे आऊटफीट खरेदी करण्यावर भर द्यावा. समर वेडिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे. फ्लोरल प्रिंट्स, सॉफ्ट टोनपासून ते बोटॅनिकल मोटिफ्सचे ब्रायडल आऊटफिट्स तुमच्या सौंदर्याला चारचाँद लावतील, यात काही शंका नाही. (Take care of the wedding outfit)

योग्य ज्वेलरीची करा निवड

लग्नासाठी ज्वेलरीची निवड करताना वधूने एका गोष्टीची प्रामुख्याने काळजी घेणे गरजेचे आहे. ती गोष्ट म्हणजे ज्वेलरी जड असता कामा नये. आजकाल लग्नामध्ये जड ज्वेलरी कुणी घालत नाही. त्याऐवजी मिनिमल ज्वेलरी खरेदी करा. उन्हाळ्यातील लग्नासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. मिनिमल ज्वेलरी लूक कॅरी केल्यामुळे, तुम्हाला फार गरम होणार नाही. (Choose the right jewellery)

Summer Wedding Tips
Bridal Makeup Skincare Tips : परफेक्ट ब्रायडल मेकअप हवायं ? मग फॉलो करा हे स्किनकेअर रूटीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com