इंडियन सुपरफूड! आहारात करा 'या' भारतीय पदार्थांचा समावेश

भारतीय सुपरफूडचा करा आहारात समावेश
food
foodsakal

शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आहारात सुपरफूडचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. सुपरफूडमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व अनेक आजारांपासून संरक्षणही मिळतं. सुपरफूड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर बेरीज, एव्होकाडो ही फळं येतात. मात्र, आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये असे असंख्य पदार्थ आहेत जे सुपरफूड म्हणून कार्य करत असतात. म्हणूनच, भारतीय सुपरफूड कोणते ते पाहुयात. (super foods indian superfoods you should include in your diet)

१. आवळा-

बहुगुणी म्हणून आवळ्याकडे पाहिलं जातं. त्वचेपासून केसांपर्यंत असंख्य फायदे आवळ्याचे आहे. विशेष म्हणजे आवळा म्हणजे भारतीय सुपरफूडपैकी एक फळ आहे. संत्री व लिंबाच्या तुलनेत आवळ्यामध्ये व्हिटामिन सी चं प्रमाण जास्त असतं. तसंच त्यात डायटरी फायबर, फॉस्फरस, आयरन आणि कॅल्शिअम यांचंही प्रमाण जास्त असतं. आवळ्यामुळे सर्दी-पडसं, डोळ्यांचे विकार या तक्रारी दूर होतात. तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

२. हळद -

आयुर्वेदामध्ये हळदीला प्रचंड महत्त्व असून पूर्वापार तिचा वापर करण्यात येतो. हळदीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासोबतच शरीरावरील जखमदेखील भरुन निघण्यास मदत मिळते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेंट्री, अँटी- बॅक्टीरिअल गुण असतात. ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होते. त्यामुळे आहारात नियमितपणे हळदीचा वापर केला पाहिजे.

३. दही -

दह्यामध्ये प्रोबायोटिक गुण असतात. ज्यामुळे बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव कमी करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. १ वाटी दह्यामधून १०० ते १५० कॅलरी आणि २० टक्के कॅल्शिअम शरीराला मिळतं. त्यामुळे हडे बळकट होण्यास मदत मिळते.

४. शेवग्याची शेंग -

शेवग्याची शेंग हे सर्वोत्तम सुपरफूड आहे. या शेंगांमध्ये अँटी- ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशिअम, कॅल्शिअम, आयरन, प्रोटीन आणि अमिनो अॅसिडचा समावेश असतो.

५. तूप -

तूपामध्ये अँटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण सर्वात जास्त असतं. तसंच व्हिटॅमिन ए आणि ई, डी मुळे हाडांना बळकटी मिळते. तसंच स्नायूंमधील वेदना कमी होतात. तसंच शरीरातील सांध्यामधील ऑइलिंग व्यवस्थित होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com