esakal | सुजलेल्या डोळ्यांमुळे आहात हैराण? फॉलो करा या टिप्स

बोलून बातमी शोधा

eyes
सुजलेल्या डोळ्यांमुळे आहात हैराण? फॉलो करा या टिप्स
sakal_logo
By
टीम ई सकाळ

सुजलेल्या डोळ्यांसह चेहरा खूप विचित्र दिसतो. जास्त रडणे, जास्त शारीरिक ताणतणाव, शरीरात हार्मोनल बदल, हवामानातील बदल, सायनसची समस्या, हँगओव्हर, चुकीचे खाणे, झोपेची कमतरता आणि काही अॅलर्जीसह विविध कारणांमुळे ही समस्या उद्भवली आहे. परंतु आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण आज आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत ज्याच्या सहाय्याने आपण त्यापासून सुटका करू शकता.

कोल्ड कॉम्प्रेस – यासाठी एक चमचा फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर बाहेरच्या बाजूनं हा चमचा डोळ्यांवर ठेवून हलकेच दाबा. यामुळं डोळ्यांची सूज कमी होईल.

भरपूर झोप – एका व्यक्तीनं किमान 6-7 तास तरी शांत आणि पूर्ण झोप घेणं गरजेचं असतं. जर तुमची झोप झाली नाही तरीही तुम्हाला ही समस्या येऊ शकते.सोबतच काळी वर्तुळंही दिसू शकतात. यासाठी चांगली झोप घ्या.

भरपूर पाणी प्या – शरीरात पाण्याची कमतरता असेल तरीही डोळ्यांखाली सूज येते. यासाठी सकाळी उठल्यानंतर किमान 2 तास नॉर्मल पाणी प्यावं. रात्री झोपण्यापूर्वी देखील पाण्याचं सेवन फायदेशीर ठरतं.

जास्त मिठाचं सेवन – तुम्ही जर मिठाचं अतिसेवन करत असाल तर एका खास प्रकारच्या लिक्वीडची कमतरता जाणवल्यानं देखील डोळ्यांखाली सूज किंवा काळी वर्तुळं येतात. यासाठी मिठाचं सेवन प्रमाणात हवं. अतिसेवन करणं टाळावं.

झोपण्याची पद्धत बदला – जर तुम्ही सतत एकाच कुशीवर किंवा पोटावर झोपत असाल तर ट्राय करा की, झोपताना तुमचं डोकं शरीरापेक्षा थोडं वर उचललेलं असेल. तुमचा चेहरा आणि डोळे रात्रभर कोणत्याही उशांमध्ये किंवा चादरीत नसावं याची काळजी घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.