
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून आणि कमी वेळेत, कमी खर्चात चांगले उत्पन्न म्हणून ब्रॉयलर कोंबडी पालन करतात. मांसासह अंडी उत्पादन असा दुहेरी फायदा या कोंबडीपालनातून होतो. ब्रॉयलर पालन म्हटले, की लहान पिलांपासून सुरवात होते. मग त्यांच्या राहण्याची जागा, खाण्याची व्यवस्था तसेच पाणी व्यवस्थापनासोबतच रोगांपासून संरक्षण करणे गरजेचे असते. विशेष म्हणजे हिवाळ्यात याची चांगलीच खबरदारी घ्यावी लागते.