Gray Hair Problem: या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर केस लवकर पांढरे झालेच समजा, आहाराकडे द्या वेळीच लक्ष

केस कमी वयात पांढरे होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे चुकीचा किंवा अयोग्य आहार. अलिकडे पोषक आहाराकडे अनेकांचं दुर्लक्ष होत असल्याने आरोग्यावर विविध परिणाम होताना दिसत आहेत
आहार आणि पांढरे केस
आहार आणि पांढरे केसEsakal

एकेकाळी पांढरे केस म्हणजे वाढत्या वयाचं एक लक्षण मानलं जातं. मात्र सध्याच्या काळामध्ये पांढऱ्या केसांचा Gray Hair आणि वयाचा संबंध उरलेला नाही. याच कारणं म्हणजे अगदी कमी वयातही केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. Take Proper Diet to prevent gray Hair Growth in early age

केस अकाली पांढरे होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. काही वेळेस अनुवांशिक कारणांमुळे कमी वयातच केस पांढरे Hair Problem होवू लागतात. तसचं केमिकलयुक्त शॅम्पू Shampoo आणि तेल तसंच विविध उत्पादनांच्या वापरामुळे देखील अलिकडे केस पांढरे होण्यासोबतची समस्या वाढत चालली आहे.

याच सोबत केस कमी वयात पांढरे होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे चुकीचा किंवा अयोग्य आहार. अलिकडे पोषक आहाराकडे अनेकांचं दुर्लक्ष होत असल्याने आरोग्यावर विविध परिणाम होताना दिसत आहेत.

केसांसाठी व्हिटॅमिन बी गरजेचं

यातच आहारातून केसांसाठी गरजेचं असलेलं व्हिटॅमिन बी शरीराला पुरेश्या प्रमाणात न मिळाल्यास केसांच्या समस्या निर्माण होतात. केसाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्हिटॅमिन बी गरजेचं आहे. कमी वयामध्ये जर केस पांढरे होणं थांबवायचं असेल, तर आहारामध्ये व्हिटॅमिन बी तसचं व्हिटॅमिन बी-6, बी-12 यांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.

शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ची कमतरता निर्माण झाल्यास केसांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. तसचं बायोटीन आणि फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे केस कमी वयातच पांढरे होवू लागतात. तसचं केस गळू लागल्यास किंवा केस निस्तेज दिसू लागल्यास शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता निर्माण झाली आहे हे लक्षात घ्यावं.

हे देखिल वाचा-

आहार आणि पांढरे केस
Hair Dye : हेअर डायचा शोध परदेशात नव्हे तर भारतातच!

Vitamin B साठी या पदार्थांचा करा आहारात समावेश

कमी वयात किंवा अकाली केस पांढेर होत असल्याचं लक्षात येताच, तसंच केस लवकर पांढरे होवून नये यासाठी आहारामध्ये व्हिटॅमिन बीसोबतच व्हिटॅमिन व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन 12 असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आहारामध्ये खास करून डेअरी प्रोटक्टचा समावेश करू शकता.

म्हणजेच व्हिटॅमिन बीची कमतरचा पूर्ण करण्यासाठी दूध तसचं पनीर, दही या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. त्याचसोबत मासे, चिकन, अंडी, हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करा.

यासोबतच अँटीऑक्सिडंट्स प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचं सेवन केस निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरतं. यासाठी तुम्ही नियमितपणं ग्रीन टीचं सेवन करू शकता.

तसंच आहारामध्ये ताज्या फळांचा समावेश केल्यास केस हेल्दी राहण्यास मदत होते.

आहारामध्ये बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया या पदार्थांच्या समावेशामुळे केस चांगले राहण्यास मदत होते.

एकंदरच केसांची बाहेरू काळजी घेण्यासोबतच पोषक आणि व्हिटॅमिन्सयुक्त आहाराच्या मदतीने केसांना शरीरातून पोषण मिळणं देखील तितकच गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

आहार आणि पांढरे केस
White Hair Remedies : केस काळे करण्यासाठी नारळाच्या तेलात मिक्स करा 'या' बिया, पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com