Tech Tips
Tech Tipsesakal

Tech Tips : आला आला उन्हाळा, एसीच्या वाढत्या बिलाला घाला आळा; या ट्रिक्स येतील कामी

एप्रिल-मे महिन्याचे विजेचे बिल भरण्यासाठी खीसा खऱ्या अर्थाने गरम करावा लागतो

Tech Tips :

आजकाल आला आला उन्हाळा तब्बेत सांभाळा असे म्हणावे लागते. कारण, उन्हाळ्यात तापमान उच्च झालेले असते. ते आपल्या शरीराला बाधक ठरते. त्यामुळे थंड पाणी, एसी कुलरचे थंड वातावरण हवेहवेसे वाटते.

काही लोकांना एसीची सवय असते.कारमध्ये तर एसी हवाच पण घरीही २४ तास एसी सुरू असतो. थंड वातावरण चांगलं गारेगार वाटतं. पण, जेव्हा एप्रिल-मे महिन्याचे विजेचे बिल भरण्यासाठी खिसा खऱ्या अर्थाने गरम करावा लागतो.

Tech Tips
Tech Tips : AI च्या मदतीने Hackers चा नवा डाव, मेसेज नाही तर आता थेट फोनच येणार, उचलला तर होईल मोठं नुकसान

एप्रिल-मे महिन्यात रेफ्रिजरेटर, कुलर आणि उपकरणांचा वापरही वाढतो, ज्यामुळे वीज बिलात वाढ होते. याव्यतिरिक्त, उन्हाळ्यात घरगुती वापर वाढतो, जसे की धावणे, वाढदिवसाच्या मेजवानी आणि पाहुणे होस्ट करणे.

तसेच उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांच्या किमतीही वाढतात, त्यामुळे बिलात आणखी वाढ होते. यामुळेच आज आपण एसीचे बिल कमी कसे येईल यासाठी काय उपाय करता येतील ते पाहुयात. (Tech tips in marathi)

Tech Tips
Tech Tips : व्हॉट्सअपवर ठेवता येणार ऑडिओ स्टेटस

तापमान - एसीचे बिल कमी येण्यासाठी त्याच्या तापमानाकडे लक्ष द्या. एसीचे तापमान २४ ते २७ डिग्री सेल्सिअसवरच ठेवा. तुम्ही तापमान जितके नियंत्रणात ठेवाल तितके ५ ते ६ टक्के तुमचे विजेचे युनिट कमी जळते.  तसेच, जेव्हा गरज नसेल तेव्हा एसी बंद करा.

टायमर सेट करा - रात्री झोपल्यावर अनेक लोक हॉलमधील एसी बंद करायचा विसरतात. त्यामुळे एसीला टायमर लावून ठेवा. त्यामुळे तुम्ही जरी एसी बंद करायचा विसरला तरी तो ऍटोमेटीक बंद होईल.

दारे-खिडक्या बंद ठेवा – एसी सुरू करणार असाल तेव्हा सर्व दारे,खिडक्या बंद करा. ज्यामुळे रूम पटकन थंड होईल. आणि रूम थंड होण्यासाठी जास्त युनिट्सही जळणार नाहीत. तसेच, खिडक्या बंद केल्या तरी त्यातून येणाऱ्या उन्हाच्या झळाही परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे काचांसाठी पडदे लावा.

Tech Tips
Tech Tips : आता सुरू केला नाही तोवर संपला इंटरनेट डेटा, मोबाईलमधील हे सेटींग चेक करा

एसीची काळजी घ्या - एसीमध्ये असलेला एअर फिल्टर नेहमी स्वच्छ करा. एसी अस्वच्छ असेल तर तो काम करताना अधिक वीज घेईल. त्यामुळे वेळच्यावेळी एसी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

 

एसीचे सर्व्हिसिंग करा

हे सुनिश्चित करेल की एसी कार्यक्षमतेने काम करत आहे आणि वीज वापर कमी आहे. एसी युनिटच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा: यामुळे हवेचा प्रवाह सुधारण्यास आणि विजेचा वापर कमी होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com