
डॉ राजश्री पाटील
घराची सजावट हा अतिशय कळीचा मुद्दा असतो. रंगांच्या निवडीपासून फ्लॉवरपॉटच्या जागेपर्यंत किती तरी गोष्टी घराचं सौंदर्य आणि त्याचं ‘घरपण’ही खुलवतात.
‘घर’ हा शब्द उच्चारला की आपापला हक्काचा अवकाश आपल्या डोळ्यांसमोर येतो. ‘निरामय’, ‘श्रमसाफल्य’ ‘अक्षरवेल’ अशी नावं, दागिन्यांसारखी मिरविणारी घरं. इथं आपल्याला कामं करता येतात, तसं फतकल मारून बसताही येतं. भवतालच्या विस्तीर्ण अवकाशाचा वेगळ्या पद्धतीनं रेखलेला एक भाग म्हणजे आपलं घर. आपापला अवकाश घडवण्याची इच्छा प्रत्येकाच्या ठायी असते. या अवकाशाचं साकार रूप म्हणजे घर.