सकाळपासून पाच तरी फोन लावले असतील. कधीतरी ‘बिझी’, कधी ‘आउट ऑफ कव्हरेज’ आणि आता चक्क बंद आहे असं सांगत होते. गेले दोन दिवस झाले हाच उपक्रम सुरू आहे. खरंतर कोणासाठीही मी एवढा प्रयत्न आजपर्यंत केला नाही; पण पुण्यात आल्यापासून आमच्या गुरुजींसाठी मात्र हे करावं लागतं.