हा लेख आणि इथून पुढचे दोन लेख हे बहुतेक प्रवासामध्येच लिहून होणार.. मागच्या वेळेसारखंच आत्तासुद्धा मी मुंबई-पुणे असा प्रवास करते आहे. पुणे-मुंबई प्रवास करताना माझा सगळ्यात आवडता ऋतू असतो तो म्हणजे पावसाळा. आकाशामध्ये ढगांची आणि डोक्यामध्ये विचारांची गर्दी असते. पावसाळ्यामध्ये पुणे किंवा मुंबईमध्ये असले आणि मुख्य म्हणजे प्रवासामध्ये असले, की महाबळेश्वरची थोडी कमी आठवण येते.