- मिलिंद गवळी आणि दीपा गवळी
कधी कधी नात्यांची सुरुवात प्रेमानं होते; पण त्या नात्याला खरी स्थैर्य आणि जिव्हाळ्याची किनार मैत्रीच देते. अभिनेते मिलिंद गवळी आणि त्यांची पत्नी दीपा गवळी यांचं नातं हे याचं सजीव उदाहरण. जवळजवळ ४३ वर्षांचा एकत्रित प्रवास. त्यातली ३४ वर्षं विवाहाची आणि त्याआधीची ९ वर्षं प्रेमाच्या वावटळीत; पण या सगळ्यात ‘मैत्री’ फुलली ती सर्वांत शेवटी - आणि याचमुळे ती अधिक खोल, अधिक खऱ्या अर्थाने ठसलेली.