- अश्विनी आपटे- खुर्जेकर
आपल्याला नेहमी आपल्यासारखंच काहीतरी आवडतं आणि पटतं. म्हणजे आपल्यासारखं विचार करणारे, आपल्यासारखं वागणारे, आपल्याप्रमाणेच राहणारे लोक आपल्याला जवळचे आणि योग्य वाटतात. आपल्यापेक्षा वेगळं कोणी काही वागत असेल किंवा करत असेल तर आपण गोंधळून जातो, अस्वस्थ होतो. कधी कधी चिडतोही.