
शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
‘घरी रात्रीचं जेवण चालू आहे; पण मनात उद्याच्या कामाचे विचार घोळतायेत, मुलांबरोबर वेळ घालवतेय; पण मनात कालच्या मीटिंगचे विचार चालू आहेत, घरच्यांबरोबर फिरायला बाहेर पडलोय; पण प्रोजेक्ट डेडलाइनचा विचार मनात डोकावतायेत, मुलांचा अभ्यास घेताय; पण उद्याच्या मीटिंगची तयारी मनात कुठेतरी सुरूच आहे....’