- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आपल्याला वाटतं, ‘मी’ म्हणजे माझं शरीर, माझा मेंदू, आणि माझं मन - सगळं एकाच पद्धतीने चालतं; पण रोजच्या अनुभवांमध्ये लक्षात येतं, की ही तिघं नेहमीच एका रेषेत चालतील असे नाही. आपला मेंदू काहीतरी सांगतो, आपल्या मनाला काहीतरी वेगळं वाटत असतं, आणि आपली कृती ह्यांच्यापेक्षा वेगळी असते. हे नेमकं असं का घडतं? आणि मग असा प्रश्न पडतो, की हे तिघं इतके वेगवेगळे का वागतात?