नवकल्पनांची ‘पालवीsakal
लाइफस्टाइल
नवकल्पनांची ‘पालवी
आमच्या 'पालवी ग्रुप'च्या नावाने दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि आम्ही महिन्यातून एकदा एकत्र येतो. नवरात्रीच्या उत्सवांत भोंडला, दांडिया, सहभोजन आणि सहलींमध्ये आनंद घेतो.
मनीषा मोरे-देशमुख
आमच्या ग्रुपचे नामकरण ‘पालवी ग्रुप’ असे होऊन साधारणत: दहा वर्षे झाली. आमचा छोटा ग्रुप. महिन्यातून एकदा आम्ही भेटतोच. वर्षभरात नवरात्रीचा भोंडला, दांडिया खेळणे, गाणी म्हणणे, सहभोजन, छोट्या छोट्या सहलींचे आयोजन, हुरडा पार्टी अशा उपक्रमांमधून एकत्र येऊन आम्ही आनंद घेतो. रोजच्या त्याच-त्या रुटिनमधून थोडासा विरंगुळाच म्हणा ना!

