
सुखदा खांडकेकर
भेटवस्तूचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. आकर्षक रॅप केलेल्या कागदाच्या आत काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचं रॅपिंग अगदी कोणताही विचार न करता फाडून टाकलं जातं. परंतु, या रॅपिंगमध्येही भेट देण्याएवढ्याच भावना दडलेल्या असतात, याचा विचार खूप कमी व्यक्ती करतात. या भावना जपण्याचाही छंद असू शकतो... असाच अनोखा छंद आहे माझा.