- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
‘तुला काय माहीत? माझं मी बघून घेईन, तू मध्ये पडू नकोस.. तुला यातलं काही कळणार नाही.. तू घरीच असतेस ना तुला काय घाई? तुझं मत विचारायलाच पाहिजे असं काही नाही..’ ही वाक्यं दिसायला साधी वाटत असली, तरी अशा वाक्यांमुळे आपण दुसऱ्या माणसाचा अनादर करत असतो आणि मग मात्र ‘माझा तुला दुखवण्याचा हेतू नव्हता’, ‘मी फक्त मस्करी करत होतो किंवा होते.’ ‘मी अगदी सहज बोलून गेले किंवा गेलो’, ही सारवासारव काही उपयोगाची नसते.