
अश्विनी आपटे- खुर्जेकर - व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी हा शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो; पण या शब्दाचा अर्थ, त्याची खोली आणि सकारात्मकतेची स्वीकृती, खरंच आपल्याकडे आहे का? या शब्दाची ताकद खूप मोठी आहे. सकारात्मकता म्हणजे आशावादी दृष्टिकोन ठेवणं, संधींवर लक्ष केंद्रित करणं आणि कठीण परिस्थितीतसुद्धा समाधान शोधण्याची वृत्ती. आपण सहजपणे एकमेकांना सल्ला देतो, की आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकले पाहिजे; पण म्हणजे नक्की काय करणं अपेक्षित आहे हे तुम्हाला नक्की माहीत आहे का? सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक राहण्याची क्षमता.