
शलाका तांबे
शलाका तांबे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकीच वेगळी मते. लोकांची मते कधी तुमच्या मतांशी जुळतात , तर कधी जुळत नाहीत. सहमती आणि असहमती प्रत्येक नातेसंबंधांचा एक भाग आहे. कधी ना कधी असहमत असणे अगदी सामान्य आहे. मतभेद कोणत्याही गोष्टींबद्दल असू शकतात, पालकत्वाच्या शैली, करिअरबद्दलचे विचार, आर्थिक विचार, राजकारण असो, जीवनाची मूल्ये, मुलांचे संगोपन, असे तात्त्विक मुद्दे किंवा अगदी साधे म्हणजे, मला हेच रेस्टॉरंट आवडते, किंवा एकत्र वेळ कसा घालवायचा, असे वेगवेगळे दैनंदिन संघर्षसुद्धा आपण अनुभवत असतो. मतभेद हा सामान्य भाग असला, तरी तो बऱ्याच वेळेला नातेसंबंधांमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो आणि मतभेद टोकाला गेले, की ते विनासंघर्ष हाताळणे थोडे कठीण जाते.