आज लिहायला बसायला मी वेगवेगळी ठिकाणं निवडली आहेत.. म्हणजे मी बसले आहे एकाच ठिकाणी; पण आजूबाजूची ठिकाणं वेगानं बदलत आहेत. थोडक्यात पुणे ते मुंबई हा प्रवास माझा सुरू आहे.. मागचा लेख लिहून झाल्यानंतर मधले पंधरा दिवस कुठं गेले कळलंच नाही..
आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे दोन जूनला आम्ही ‘मना’चे श्लोक’ या माझ्या लेखन व दिग्दर्शकीय दुसऱ्या सिनेमाची अनाउन्समेंट केली. लग्न दोन महिन्यांवर आलेलं असलं म्हणजे घरामध्ये जी घाई सुरू असते, तसंच काहीसं सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आधी सुरू असतं..