railway journeysakal
लाइफस्टाइल
गोष्ट एका प्रवासाची
मला नेहमीच असं वाटतं, की आपल्याला बोलावणं आल्याशिवाय कुठल्याही तीर्थक्षेत्री जाणं होत नाही. मी ‘वर्तुळ’ ही मालिका करत होते.
मला नेहमीच असं वाटतं, की आपल्याला बोलावणं आल्याशिवाय कुठल्याही तीर्थक्षेत्री जाणं होत नाही. मी ‘वर्तुळ’ ही मालिका करत होते. मनात सतत अक्कलकोटला जाण्याचा विचार सुरू होता; पण काही केल्या योग जुळून येत नव्हता- कारण शूटिंग अगदी सलग सुरू होतं. मी एक दिवसाची सुट्टी घेतली, तरी बरीच कामं अडकायची. त्यात अक्कलकोटला जायचं म्हणजे तीन दिवस सुट्टी हवीच.
