
शीतल ढेकळे
आपल्याला जन्म देणाऱ्या आईलाच आपली काळजी असते, म्हणूनच तिला ‘वात्सल्यसिंधू’ आई म्हणतात. तिचे प्रेम हे जीवनात आयुष्याच्या शेवटपर्यंत असते. सुख-दुःखात; तसेच अत्यंत संकटकाळात आईच आपली काळजी घेते. आपल्या मुलीने तिच्या कर्तृत्वाने जीवनात यश मिळवत गगनभरारी घ्यावी, अशी आकांक्षा बाळगणाऱ्या माझ्या आईचे नाव नलिनी ढेकळे. माझ्या आई-वडिलांचे मी प्रथम अपत्य असल्याने मला भरपूर प्रेम मिळाले. नंदीग्राममध्ये (जिल्हा नांदेड) जिल्हा परिषदेच्या शाळेतच माझे प्राथमिक शिक्षण झाले.