- अश्विनी आपटे- खुर्जेकर
संवाद सुधारावा लागतो, सुसंवाद हवा, कसं बोलावं, कशा प्रकारे ऐकावं, यावर नेहमीच चर्चा होते. आपणही अनेकदा संवादकौशल्य, योग्य भाषा, टोन, हावभाव, आत्मविश्वासानं बोलणे यावर बोलतो. मात्र, याच्यापलीकडे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे संवादाचं मूळ उद्दिष्ट जाणून घेणं, एकमेकांना समजून घेणं.