गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतरही राहू शकते प्रेग्नंसी

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावरही का राहते प्रेग्नंसी?
unwanted pregnancy increases due to lack of knowledge of contraception
unwanted pregnancy increases due to lack of knowledge of contraception
Updated on

सध्याच्या काळात प्रत्येक जण करिअर ओरिएंटेड career oriented झाला आहे. त्यामुळे अनेक दाम्पत्य लग्नानंतर फॅमेली प्लॅनिंग करतात. यात अनावश्यक गर्भधारणाunwanted pregnancy टाळण्यासाठी अनेक स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्यांचा contraceptive pills वापर करतात. मात्र, अनेकदा या गोळ्या घेतल्यानंतरही अनेक स्त्रियांना प्रेग्नंसी राहते. म्हणूनच, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावरही प्रेग्नंसी का राहते याविषयी 'हेल्थ साईट.कॉम'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. (these 3 mistakes that can make contraceptive pills fail)

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना काही मुलभूत गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही गोष्टी केल्या तर गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतरही प्रेग्नंसी राहू शकते. म्हणूनच, स्त्री रोगतज्ज्ञ काय सांगतात ते पाहुयात.

१. नियमित गोळ्या न घेणे -

गर्भनिरोधक गोळी घेताना त्यात २४ तासांचं अंतर असावं. मात्र,त्यापेक्षा जास्त अंतर असू नये. जर तुम्ही गर्भनिरोधक गोळी सकाळच्या वेळात घेण्यास सुरुवात केली असेल तर महिनाभर सकाळीच घेत जा. गोळ्यांची वेळ चुकली तर या गोळ्यांचा परिणाम होत नाही.

unwanted pregnancy increases due to lack of knowledge of contraception
श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

२. गोळी घेण्यास विसरणे-

अनेक स्त्रिया गर्भनिरोधक गोळी घेण्यास विसरतात किंवा कंटाळा करतात. अनेक जणी सुरुवातीच्या काळात गोळ्या घेतात. परंतु, नंतर कंटाळा करतात. मात्र, असं केलं तर तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता अधिक असते. पहिल्या आठवड्यामध्ये या गोळ्यांमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास प्रतिबंध केला जातो. परंतु, याच काळात तुम्ही गोळी न घेता असुरक्षित सेक्स केला तर गर्भधारणा राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच २४ तासांच्या आता इमर्जन्सी पील्स घ्यावीत.

३. असुरक्षित सेक्स -

गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा पाचव्या दिवसापासून घेण्यास सुरुवात केली जाते. परंतु, मासिक पाळीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी या गोळ्या घेण्यास सुरुवात केली असेल तर त्यानंतर कमीत कमी ७ दिवस असुरक्षित शरीरसंबंध प्रस्थापित करता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com