Migraine Home Remedies: मायग्रेनच्या वेदनांनी झालात त्रस्त? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर ते खूप गंभीर असू शकते. हा त्रास मायग्रेनचाही असू शकतो.
Migraine
Migraine sakal

लोकांना कामाचा ताण आणि दिवसभराची धावपळ यामुळे अनेकदा तणाव जाणवतो आणि आरोग्याच्या समस्यांना ते बळी पडतात. डोकेदुखी देखील या समस्यांपैकी एक असून अनेक कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. पण जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर ते खूप गंभीर असू शकते.

हा त्रास मायग्रेनचाही असू शकतो, त्यामुळे सतत होणाऱ्या डोकेदुखीकडे अजिबात दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मायग्रेनचे दुखणे अगदी असह्य असते, एकदा हा त्रास सुरू झाला की लवकर थांबत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच 3 शक्तिशाली उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही यापासून दूर राहू शकता.

खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मोबाईल-लॅपटॉपचा जास्त वापर यामुळे मायग्रेन उद्भवू शकते. अनेक वेळेस लोकं मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलरचा अवलंब करतात.

Migraine
Skin Care: तुम्हीही फेस वॉशनंतर टॉवेलचा वापर करता? त्वचेला होऊ शकते भयंकर नुकसान

1. नाडी शोधन

तुमची उजवी नाकपुडी तुमच्या उजव्या बोटाने बंद करा आणि तुमच्या डाव्या नाकपुडीतून कमीत कमी ५ मिनिटे हळू आणि हळू श्वास घ्या. खोलवर श्वास घ्या आणि सोडा. हा व्यायाम दर तासाला पुन्हा करा. हे मेंदू आणि नर्व्हस सिस्‍टम शांत करण्यास आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

2. भिजवलेल्या गोष्टी

5 बदाम आणि 5 काळे मनुके एकत्र भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करा. बदामामध्ये आढळणारे मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देऊन तुमच्या शरीराला डोकेदुखीपासून वाचवण्यास मदत करते. भिजवलेले मनुके 12 आठवडे सतत खाल्ल्यास शरीरातील एकूण अतिरिक्त पित्त तसेच ऍसिडिटी, मळमळ, जळजळ, मायग्रेनशी संबंधित सर्व लक्षणे कमी करण्यास मदत होते. तसेच तुम्ही 1 चमचे धणे एक ग्लास पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी देखील पिऊ शकता.

3. गाईच तूप

आपल्या गाईचे तूप आरोग्याला खूप फायदेशीर ठरते. मायग्रेनच्या दुखण्यावरही हे खूप प्रभावी ठरते. तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही गाईचे तूप पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता. तसेच गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्यानेही दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com