Oatmeal Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा ओटमीलचा समावेश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Oatmeal Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी आपण नियमितपणे व्यायाम करणे आणि आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करणे या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
Oatmeal Benefits
Oatmeal Benefits esakal

Oatmeal Benefits : सध्याचे धकाधकीचे जीवन, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी आपण नियमितपणे व्यायाम करणे आणि आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करणे, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत.

ओटमील हा त्यापैकीच एक खाद्यपदार्थ आहे. या ओटमील्सचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच निरोगी आरोग्यासाठी ओटमील हा एक हेल्दी ऑप्शन आहे. त्यामुळे, अनेक जण त्यांच्या आहारात या ओटमील्सचा समावेश करतात. आज आपण या ओटमील्सचे आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

Oatmeal Benefits
Health Care : हिवाळ्यात खायलाच हवा हरभरा, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हृदयासाठी फायदेशीर

या ओटमील्समध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्सचा समावेश आढळून येतो. ही पोषकतत्वे फ्री रॅडिकल्सशी लढून आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, ज्या लोकांना हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात ओटमील्सचा जरूर समावेश करावा. (Beneficial for heart)

उच्च रक्तदाबासाठी आहे लाभदायी

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल किंवा तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात ओट्सचा जरूर समावेश करू शकता. पचायला हलके आणि खायला ही स्वादिष्ट असणारे हे ओट्स पोषकघटकांनी परिपूर्ण असतात.

उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासोबतच ओट्स हे ताण-तणाव कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. ओट्ससोबत तुम्ही तुमच्या आहारात ओट्सचे जाडे-भरडे पीठ देखील समाविष्ट करू शकता. जर नियमितपणे तुम्ही या ओट्सचे आणि ओटमीलचे सेवन केले तर तुम्हाला उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. (Beneficial for blood pressure)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात विरघळणारे फायबर्स आणि बीटा-ग्लूकन आढळून येतात. हे पोषकघटक शरीरावर झालेली जखम भरण्यास मदत करतात. तसेच, या जखमेवर करण्यात येणाऱ्या उपचारांना गती देण्याचे काम करतात. यासोबतच ओट्समध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.( helps to boost immunity)

पिंपल्सची समस्या दूर करते

ओट्समध्ये फायबर्स, जीवनसत्वे यांच्या व्यतिरिक्त झिंकचे देखील भरपूर प्रमाण आढळते. हे झिंक आपल्या चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्ससोबत लढण्याचे काम करते. यासोबतच त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकण्याचे काम ओट्स करते. ज्यामुळे, आपली त्वचा निरोगी राहते आणि पिंपल्सची समस्या दूर होते. (Reduce the problem of pimples)

Oatmeal Benefits
Rice Water Benefits : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते उर्जा वाढवण्यापर्यंत, तांदळाचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com