Valentines Day 2024 : पहिल्यांदाच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताय? मग, महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

‘व्हॅलेंटाईन डे’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.
Valentines Day 2024
Valentines Day 2024esakal

Valentines Day 2024 : ‘व्हॅलेंटाईन डे’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यापूर्वी आठवडाभर आधी प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. मग, रोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे इत्यादी प्रकारचे अनेक दिवस साजरे केल्यानंतर ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी अनेक कपल्स विविध ठिकाणी फिरायला जातात. जर तुम्हाला ही यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ नयनरम्य ठिकाणी साजरा करायचा असेल तर, तुम्ही महाराष्ट्रातील काही ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Valentines Day 2024
Valentine Day 2024 : जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे? मग, ‘या’ ऑफबीट ठिकाणांना नक्की द्या भेट

खंडाळा

खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले हे अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे. येथील सुंदर दऱ्या, हिरवागार परिसर आणि तलाव यामुळे हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. कपल्समध्ये तर हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.

खंडाळा हे ठिकाण मुंबईपासून आणि पुण्यापासून देखील जवळ आहे. येथील शांततापूर्ण आणि नयनरम्य परिसरात दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. खंडाळ्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणे आहेत, जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्रातील आकर्षक पर्यटन स्थळ असण्यासोबतच एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहराला विशेष महत्व आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ही या शहराची खास ओळख आहे.

वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिर इत्यादी अनेक पर्यटन स्थळे या शहराच्या आजूबाजूला आहेत. या शहरातील सिद्धार्थ गार्डन आणि’ बिबी का मकबरा’ या ठिकाणी पर्यटक आवर्जून भेट देतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या शहरातील ही सर्व प्रसिद्ध ठिकाणे नक्कीच एक्सप्लोअर करू शकता.

माथेरान

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानला ओळखले जाते. हे ठिकाण स्वर्गाहून काही कमी नाही, याचा अनुभव येथे गेल्यावर नक्की येतो. माथेरानमधील उंच पर्वत, दाट हिरवळ, धुके आणि विविध पर्यटन स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. जोडप्यांमध्ये हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.

Valentines Day 2024
Travel Diaries with Pets : पाळीव कुत्र्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे? मग, त्यापूर्वी IRCTC चे 'हे' नियम घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com