Unhealthy Habits : वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात ‘या’ वाईट सवयी

वाईट सवयींनी दिवसाची सुरूवात केल्यावर त्याचे शरीरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात.
Unhealthy Habits
Unhealthy Habitsesakal

रोजचा तुमचा दिवस हा तुम्ही कसा सुरू करता ? त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुमचा दिवस उशिराने सुरू होत असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण, उशिरा उठल्यामुळे तुमच्या आरोग्यावर आणि कामावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, निरोगी जीवनशैली आणि निरोगी दिनचर्या असणे हे फार महत्वाचे आहे.

अस्वस्थ आणि चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या सवयींमुळे दिवस सुरू केल्यावर त्याचे शरिरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात. अनेकांना सकाळी उशिरा उठण्याची आणि उठल्याबरोर ब्रश न करता चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते.

या वाईट सवयी तुमचे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. या वाईट सवयींमुळे तुमचे वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. कोणत्या आहेत त्या वाईट सवयी ? ज्या तुम्ही बंद करणे गरजेचे आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वजन वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ‘या’ वाईट सवयी खालीलप्रमाणे -

उशिरा पर्यंत झोपून राहणे

जर तुम्ही रात्रीचे जागरण करत असाल आणि सकाळी उशिरापर्यंत झोपत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे वजन आणखी वाढू शकते. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही रोज ६-७ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही उशिरा उठत असालं तर, मग तुमचा नाश्ता ही उशिरा होणार. उशिरा नाश्ता केल्याने याचा तुमच्या मेटॅबॉलिजमवर वाईट परिणाम होऊ शकतो. मेटॅबॉलिजमवर परिणाम झाला तर वजन वाढण्याचा धोका वाढतो.

Unhealthy Habits
Health Care News: सकाळी उठल्याबरोबर 'ही' लक्षणे दिसली तर करू नका दुर्लक्ष, असतील हृदयविकाराची लक्षणे

सकाळी उठल्यावर कोमट पाणी न पिणे

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिणे हे अतिशय महत्वाचे आहे. हे पाणी आपल्या शरिरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत करते. तसेच, शरीराच्या प्रत्येक जैविक कार्यासाठी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिणे हे गरजेचे आहे.

एक ग्लास पाणी पिल्यामुळे शरिरातील कॅलरीज बर्न्स होण्यास मदत मिळते. जर तुम्ही उठल्यावर पाणी पित नसालं तर मग तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि फॅट्स बर्न होत नाहीत. या उलट लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते.

सकाळी व्यायाम न करणे

आपल्यातील अनेकांना सकाळी व्यायाम न करण्याची वाईट सवय असते. ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न्स होण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.

सकाळी व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि शरिराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. वजन वाढू नये यासाठी तुम्ही रोज सकाळी न चुकता व्यायाम करायला हवा. त्यामुळे, जर तुम्हाला व्यायाम न करण्याची वाईट सवय असेल तर ती वेळीच बंद करा.

Unhealthy Habits
Health Tips: आरोग्याच्या समस्या झटक्यात होतील दूर म्हणून Weight Loss आहे गरजेचा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com