Hair Care Tips : हिवाळ्यात तुमचेही केस खूप गळतात? मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आपण सर्वजण आरोग्याची खास काळजी घेतो. मात्र, त्वचेची आणि केसांची म्हणावी तशी काळजी घेत नाही.
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal

Hair Care Tips : हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आपण सर्वजण आरोग्याची खास काळजी घेतो. मात्र, त्वचेची आणि केसांची म्हणावी तशी काळजी घेत नाही. या दिवसांमध्ये वातावरणाचा केसांवर आणि त्वचेवर ही परिणाम होतो. त्वचा कोरडी पडते आणि केस कोरडे आणि फ्रिझी होऊ लागतात. मात्र, यासोबतच केस मोठ्या प्रमाणात गळतात.

ही केसगळती रोखण्यासाठी महिला मग मार्केटमधील अनेक महागडे शॅंम्पू, कंडिशनर्स आणि हेअर सिरम्सचा वापर करतात. परंतु, यामुळे, केसांना तात्पुरता फरक पडतो. त्यानंतर, काही दिवसांमध्येच केस पुन्हा गळायला लागतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? की केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात. (Use this hair loss remedy)

Hair Care Tips
Hair Falls : केस गळण्यामागची ‘ही’ प्रमुख कारणे तुम्हाला माहित आहेत का?

खराब केसांसाठी असा करा उपाय

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक महिलांचे केस खराब होतात. केस तुटण्यासोबतच ते जास्त प्रमाणात गळतात. या समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात आधी २ चमचे व्हिनेगर घ्या आणि त्यात १ अंडे फेटून घाला. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळा आणि केसांना लावा. जवळपास अर्ध्या तासानंतर केस धुवा. हा उपाय केल्याने तुमची खराब केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल. (Do this remedy for bad hair)

केसांसाठी चहापावडरचे पाणी

केसांसाठीचा हा चहापावडरच्या पाण्याचा उपाय कदाचित अनेकांना माहित असेल. केसगळतीसाठी आणि केसांच्या इतर समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा सोप उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी वापर करण्यात आलेली चहापावडर एका भांड्यात घ्या. त्यानंतर, त्यात पाणी मिसळून ते पाणी पुन्हा उकळा. (Tea powder water for hair)

त्यानंतर, चहापावडरचे हे पाणी गाळून घेऊन ते थंड करायला ठेवा. आता या थंड झालेल्या चहापावडरच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि या पाण्याने तुमचे केस धुवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा हा उपाय केसांवर करू शकता.

Hair Care Tips
Hair Care Tips : फ्रिझी केसांमुळे त्रस्त आहात? मग, 'या' आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com