Skin Tightening Face Packs
Skin Tightening Face Packs esakal

Skin Tightening Face Packs : चेहऱ्याची त्वचा सैल झालीय? मग ‘या’ घरगुती फेसपॅक्सची घ्या मदत

चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली तर काय करायचे? हा प्रश्न अनेकांना पडतो.

Homemade Face Packs : चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण चेहऱ्याची विविध प्रकारे काळजी घेत असतो. चेहऱ्यावरील डाग, काळवंडलेपणा आणि सुरकुत्या निघून जाण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करत असतो.

या उपायांमध्ये मग काही घरगुती आणि काही आयुर्वेदिक उपायांचा समावेश होतो. चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपण हे उपाय फॉलो करतो मात्र, चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली तर काय करायचे? हा प्रश्न अनेकांना पडतो.

तुम्हाला सुद्धा ही समस्या जाणवत आहे का? मग, चिंता करण्याचे काम नाही. आज आम्ही खास तुमच्यासाठी काही घरगुती फेसपॅक्स घेऊन आलो आहोत. हे फेसपॅक्स तुमच्या चेहऱ्यावरील सैल त्वचा घट्ट करण्यास नक्कीच मदत करतील. चला तर मग जाणून घेऊयात या फेसपॅक्सबद्दल.

Skin Tightening Face Packs
Face Packs for Dry Skin : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात?गुलाबजल आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

ओट्स आणि मध

ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अनेक जण आहारामध्ये ओट्सचा समावेश करतात. परंतु, हे ओट्स आरोग्यासोबतच आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत.

हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात ३ चमचे ओट्स घ्या. १ चमचा मध घ्या. आता हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे एकत्र करा. तुम्ही हवं तर यामध्ये गुलाबजलचे ३-४ थेंब मिसळू शकता. आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा घट्ट करण्यासाठी काम करेल.

Skin Tightening Face Packs
Combination Skin Face packs : मिश्र त्वचेमुळे त्रस्त आहात ? कोरफड आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

दही आणि केळी

केळ्याचा वापर हा प्रामुख्याने त्वचेवर ग्लो आणण्यासाठी केला जातो. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो. त्यामुळे, आरोग्यासोबतच केळी आपल्या त्वचेसाठी देखील तितकीच फायदेशीर आहेत. दह्याबद्दल बोलायचे झाल्यास दही आपल्या त्वचेला मॉईश्चराईझ करण्याचे काम करते. त्यामुळे, हे दोन्ही घटक एकत्र आल्यावर सैल त्वचा घट्ट होण्यास मदत होते.

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात १ केळ चांगले स्मॅश करून घ्या. त्या केळ्यामध्ये ४-५ चमचे दही घाला. आता हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे एकत्र करा. तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा नंतर धुवून टाका. तुमच्या चेहऱ्याची सैल झालेली त्वचा घट्ट् होण्यास या फेसपॅकमुळे मदत होईल. अधिक चांगल्या परिणामांसाठी हा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा लावा.

Skin Tightening Face Packs
Face Packs For Sensitive Skin : संवेदनशील त्वचेमुळे त्रस्त आहात? बदाम आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com