Indoor Plants : खिडकीमध्ये लावा 'ही' झाडे, खोलीचे सौंदर्य वाढेल अन् घरात राहील भरपूर प्रकाश

Indoor Plants : आजकाल प्रत्येकाला झाडे वनस्पती घरात, घराजवळ आणि बागेत लावायला आवडतात.
Indoor Plants
Indoor Plantsesakal

Indoor Plants : आजकाल प्रत्येकाला विविध प्रकारची झाडे, वनस्पती घरात, घराजवळ आणि बागेत लावायला आवडतात. बागेतील झाडांसोबतच आजकाल इनडोअर प्लॅंट्स देखील मोठ्या प्रमाणात लावली जातात. अनेक जण बागेतील झाडे फुलवण्यासोबतच घरामध्ये, गॅलरीमध्ये, खिडक्यांमध्ये इनडोअर प्लॅंट्स ठेवतात. या झाडांमुळे घर आणि बागेच्या सौंदर्यात नक्कीच भर पडते.

विशेष म्हणजे आजकाल इनडोअर प्लॅंट्सच्या अनेक प्रजाती आल्या आहेत. ज्या तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन सहज मिळू शकतात. ही झाडे दिसायला केवळ चांगली दिसत नाहीत तर या झाडांमुळे घरात चांगला प्रकाश ही पडतो.

थोडक्यात ही झाडे घरात प्रकाश पसरवायलाही मदत करतात. जर तुम्हाला ही तुमच्या घरात भरपूर प्रकाश आणि ग्रीनरी हवी असेल तर तुम्ही घरातील खिडकीमध्ये या प्रकारचे इनडोअर प्लॅंट्स लावू शकता. कोणते आहेत हे इनडोअर प्लॅंट्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Indoor Plants
Gardening Tips : झाडांसाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशक स्प्रे, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले येतील कामी

स्पायडर प्लॅंट

स्पायडर प्लॅंट घरात लावण्यासाठी किंवा खिडकीत लावण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. स्पायडर प्लॅंटला क्लोरोफिटम कोमोसम असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे या झाडाची पाने लांब आणि रूंद आहेत. हे झाड दिसायला ही अतिशय सुंदर दिसते. खिडकीत हे इनडोअर प्लॅंट लावल्याने तुमच्या खोलीचे ही सौंदर्य वाढू शकते. (Spider plant)

स्नेक प्लॅंट

स्नेक प्लॅंट हे झाड कमी प्रकाशात ही उत्तम प्रकारे वाढते. या झाडाला भरपूर प्रकाशाची गरज नसते. शिवाय, तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज पडत नाही. या झाडाची आणखी एक खासियत म्हणजे वातावरण आल्हाददायक बनवण्यात आणि हवा शुद्ध करण्यात हे झाड मदत करते. त्यामुळे, अनेकांच्या घरात या हे झाड आवर्जून लावले जाते. तुम्ही देखील घराच्या खिडकीत हे झाड लावू शकता. या झाडामुळे घरात भरपूर प्रकाश राहण्यास मदत होते. (Snake Plant)

जेब्रा कॅक्टस

जेब्रा कॅक्टस हे झाड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पानांसाठी खास करून ओळखले जाते. हे झाड वाढवण्यासाठी भरपूर प्रकाशाची गरज पडत नाही. शिवाय, या झाडाला पाणी कमी लागते. तुम्ही घरात किंवा खिडकीत हे झाड बिनधास्तपणे लावू शकता. या झाडामुळे खोलीचे सौंदर्य ही वाढेल आणि घरात भरपूर प्रकाश ही राहील. (Zebra cactus)

Indoor Plants
Gardening Tips : झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, झाडे होतील हिरवीगार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com