Designer Net Sarees : बहिणीचे लग्न असो किंवा मैत्रिणीचा साखरपुडा, डिझायनर नेट साड्या आहेत बेस्ट ऑप्शन

कुणाचे लग्न असुद्या किंवा साखरपुडा अशावेळी त्याच प्रकारच्या सिल्क किंवा पारंपारिक साड्या नेसायला बोअर होत. खर तर अशा प्रसंगी नेहमीच्या साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही नेटच्या डिझायनर साड्या परिधान करू शकता.
Designer Net Sarees
Designer Net Sareesesakal

Designer Net Sarees : साडी हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणताही प्रसंग असो, महिला नेहमीच अशावेळी साडी नेसायला प्राधान्य देतात. साड्यांमध्ये असंख्य प्रकार आहेत. पारंपारिक, डिझायनर नेट, सिक्विन्स, पार्टीवेअर इत्यादी साड्यांची व्हरायटी आपल्याला पहायला मिळते.

कुणाचे लग्न असुद्या किंवा साखरपुडा अशावेळी त्याच प्रकारच्या सिल्क किंवा पारंपारिक साड्या नेसायला बोअर होत. खर तर अशा प्रसंगी नेहमीच्या साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही नेटच्या डिझायनर साड्या परिधान करू शकता. आजकाल नेटच्या डिझायनर आणि फॅन्सी साड्या भलत्याच ट्रेंडमध्ये आहेत. या साड्या कशाप्रकारे स्टाईल करायच्या? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Designer Net Sarees
Woman Fashion : एकाच प्रकारचे स्कर्ट घालून कंटाळा आलाय? मग, अशा प्रकारे स्टाईल करा प्लीटेड स्कर्ट

पर्ल डिझायनर साडी

पेस्टल रंग हे नेहमीच खुलून दिसतात. पिस्ता कलरची ही पेस्टल शेडमधील पर्ल डिझायनर साडी लग्नसमारंभासाठी किंवा साखरपुड्यासाठी एक चांगला पर्याय आहे. अभिनेत्री पलक तिवारी या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पलकची ही स्टायलिश साडी डिझायनर मोनिषा जयसिंह यांनी डिझाईन केली आहे.

डिझायनर नेट साडीवरील पर्लच्या या वर्कमुळे साडीला मस्त लूक येतो. या प्रकारची डिझायनर साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. या साडीवर तुम्ही पलकप्रमाणे मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करू शकता आणि मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करून तुमचा सुंदर लूक पूर्ण करू शकता.

फ्लोरल डिझायनर साडी

नेटच्या साडीमध्ये आता फ्लोरल प्रिंटचा देखील समावेश झाला आहे. नेटच्या साडीवर ही फ्लोरल प्रिंटची डिझाईन खूपच उठून दिसते. नेट साडीवरील हे फ्लोरल वर्क तुम्हाला एलिगंट आणि क्लासी लूक देईल.

अभिनेत्री नोरा फतेहीची ही साडी डिझायनर सीमा गुजराल यांनी डिझाईन केली असून अशा प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. फ्लोरल नेट डिझायनर साडी नेसल्यावर यावर तुम्ही मोकळ्या केसांची सुंदर हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी करू शकता.

Designer Net Sarees
Mira Rajput Saree Collection: पार्टीमध्ये रॉयल आणि क्लासी दिसायचंय? मग मीरा राजपूतचे हे साडी लुक करा फॉलो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com