Pregnancy Travel Tips : गरोदरपणात प्रवास करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

जर गरोदर महिलेला प्रवास करायचा असेल तर तिला अनेक सल्ले दिले जातात.
Pregnancy Travel Tips
Pregnancy Travel Tipsesakal

Pregnancy Travel Tips : कोणत्याही महिलेसाठी आई होणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. जितका मोठा हा आनंद तितकीच मोठी जबाबदारी ही असते. गरोदर महिलेच्या आयुष्यातील ही सर्वात सुंदर फेज असते. गरोदर महिलांना या काळात कुटुंबातील सदस्यांकडून किंवा नातेवाईकांकडून अनेक सल्ले देखील दिले जातात.

या काळात जर गरोदर महिलेला प्रवास करायचा असेल तर, तिला अनेक सल्ले दिले जातात. घरातील सदस्यांकडून किंवा नातेवाईक यांच्याकडून तिला या संदर्भात अनेक सूचना केल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये मग महिलांना प्रश्न पडतो की, नेमकं करायचं तरी काय ? परंतु, या परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

डॉक्टरांनी जर तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली असेल तर तुम्ही आरामात आणि व्यवस्थित काळजी घेऊन प्रवास करू शकता. मात्र, गरोदरपणात प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ? हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

डॉक्टरांची परवानगी महत्वाची

गरोदरपणात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांची या प्रवासाला परवानगी असणे महत्वाचे आहे. बरं प्रवास करताना मार्ग कोणता निवडणे योग्य राहील,जसे की, रोडने, विमानाने की ट्रेनने प्रवास करावा, या संदर्भात ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रवास करताना कोणती काळजी घ्यायची ? या संदर्भात तुमचे डॉक्टर जी काळजी घ्यायला सांगतील ती काळजी अवश्य घ्या. डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

Pregnancy Travel Tips
Pregnancy Tips : गरोदरपणात काम करताना काय काळजी घ्यावी? वर्किंग वुमनसाठी ‘या’ खास टिप्स

हलकेफुलके सामान

प्रवासाला जाण्यापूर्वी तुमची बॅग भरताना त्यामध्ये भरपूर सामान घेऊ नका. जितके सामान तुम्हाला प्रवासात गरजेचे आणि महत्वाचे आहे. तेवढेच सामान घ्या. शक्यतो हलकेफुलके सामान बॅगमध्ये पॅक करा. कंम्फर्टेबल शूज आणि कंम्फर्टेबल कपडे सोबत घ्या. वातावरण पाहून कपड्यांची निवड करा.

प्रवासाचे ठिकाण विचारपूर्वक निवडा

तुम्ही प्रवासाला कुठे जाणार आहात, तिथे पोहचण्यासाठी किती वेळ लागतो, तिथे जाणे सुरक्षित आहे का ? तिथले वातावरण कसे आहे ? या सगळ्यांचा विचार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे, तुमचे प्रवासाचे ठिकाण काळजीपूर्वक निवडा.

अगदी उंच ठिकाण, डोंगराळ ठिकाण किंवा अगदी निर्जन ठिकाण निवडू नका. त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध आहेत का ? खास करून दवाखाना, मेडिकल या गोष्टी जवळपास आहेत का ? याची खात्री करूनच प्रवासाचे ठिकाण निवडा.

हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा

प्रवासासाठी तुमची बॅग रेडी करताना त्यात हेल्दी स्नॅक्स ठेवायला विसरू नका. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तिथे जरी खाद्यपदार्थ उपलब्ध असले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ सोबत ठेवा.

कारण, या गरोदरपणात जर तुम्हाला खास काही खाण्याची क्रेविंग्ज झाली तर तो पदार्थ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, अन्यथा तुमची गैरसोय होऊ शकते.

Pregnancy Travel Tips
Exercise During Pregnancy: गरोदर महिलांनी व्यायाम करावा का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com