esakal | मित्र- मैत्रिणींसोबत भांडण झालंय, गैरसमज कसा दुर कराल?| Relationship Tips
sakal

बोलून बातमी शोधा

मित्र- मैत्रिणींसोबत भांडण झालंय, गैरसमज कसा दूर कराल?

मित्र- मैत्रिणींसोबत भांडण झालंय, गैरसमज कसा दूर कराल?

sakal_logo
By
शरयू काकडे

मैत्रीमध्ये एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यातील चांगल्या - वाईट प्रसंगामध्ये एकमेकांना साथ देतच मैत्री पक्की होते पण कधी कधी ज्या मित्र- मैत्रिणींवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्यानांच काही ना काही गैरसमज होतो. गैरसमजामुळे मैत्रीमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. अशावेळी गैरसमज दुर करणे हे खूप गरजेचे असते. पण कित्येकांना समजत नाही की गैरसमज कसे दूर करावे, सर्व काही पहिल्यासारखे कसे होईल.

मित्र- मैत्रिणींला काही दिवस थोडा स्पेस द्या

कधी कधी रागाचा किंवा एखाद्या परिस्थितीचा सामाना करताना शांत राहिले पाहिजे. कारण रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो त्यामुळे मैत्री खराब होऊ शकते. त्यामुळे अशा वेळी मित्र- मैत्रिणींला काही दिवस थोडा स्पेस द्या.

मेसेज करा

मित्र- मैत्रिणींना डायरेक्ट फोन करू नका त्याऐवजीआधी मेसेज करून त्यांचा मूड कसा आहे हे जाणून घ्या. मित्र- मैत्रिणींला तुमच्याशी बोलायचे आहे असे वाटल्यास उशीर करू नका, लगेच कॉल करा.

सोशल मीडियावर जुना फोटो शेअर करा

जेव्हा आपण दुखी होतो किंवा वाईट परिस्थितीचा सामना करत असतो, तेव्हा जुन्या आंनदी आठवणीच उपयोगी ठरतात. त्यामुळे आपल्या मित्र- मैत्रिणींचा जूना फोटो फेसबुक, इंस्टाग्राम,व्हॉट्सअॅपवर एखादी छान कॅप्शन देऊन शेअर करा. तुम्ही मित्र- मैत्रिणींनाही असे फोटो पाठवू शकता.

मित्र- मैत्रिणींना जाऊन भेटा

कधी कधी असे होते की फोन- मेसेज करूनही काही फायदा होत नाही, अशावेळी मित्र- मैत्रिणींना अचानक भेटणे फायदेशीर ठरू शकते. मित्र- मैत्रिणींच्या ऑफिस किंवा घरी जाऊन त्याला भेटा आणि गैरसमज दूर करा.

loading image
go to top