Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटीला दूर ठेण्यासाठी नियमित करा ‘या’ योगासनांचा सराव

अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी योगा फायदेशीर आहे.
Yoga For Acidity
Yoga For Acidityesakal

Yoga For Acidity : पचनक्षमता सुरळीत नसेल तर मग आपल्याला अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पचनाशी संबंधित असलेली ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा आपल्या पोटामध्ये जास्त प्रमाणात अ‍ॅसिड तयार होते. त्यावेळी, आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवते.

अ‍ॅसिडिटीची ही समस्या वाटते तितकी सामान्य नसते. कधीकधी जास्त प्रमाणात याचा त्रास होतो. अ‍ॅसिडिटी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये वेळेवर जेवण न करणे, किंवा जेवण केल्यावर लगेच झोपणे इत्यादी कारणे असू शकतात.

अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी योगा फायदेशीर आहे. योगामुळे पचनक्षमता सुरळीत केली जाऊ शकते, यासाठी योगाचा नियमितपणे सराव करणे आवश्यक आहे. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी योगा लाभदायी आहे. आज आपण अशा योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत, जे अ‍ॅसिडिटी किंवा गॅसच्या समस्येला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Yoga For Acidity
Yoga For Thyroid : थायरॉईडच्या समस्येवर आराम हवाय? 'ही' सोपी योगासनं करतील मदत

बालासन

हे योगासन पचनक्षमता सुरळीत करून पोटाच्या समस्यांना आराम देते. पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे योगासन प्रामुख्याने केले जाते. बालासन ही एक प्रकारची विश्रांतीची मुद्रा आहे. या योगासनामुळे तुमच्या पचनाच्या समस्या आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. या योगासनामुळे पोटाला ताण बसतो, त्यामुळे, पोटातील स्नायू मजबूत होण्यास मदत होते. या योगासनामुळे थकवा दूर होतो.

हलासन

अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी प्रामुख्याने हलासन हे योगासन करण्याचा सल्ला दिला जातो. पचनाच्या समस्या, अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे.

पवनमुक्तासन

पाठीला आणि पोटाला आराम आणि ताण देण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. पोटाच्या समस्या, पाठीच्या समस्या, अ‍ॅसिडिटी-गॅसची समस्या दूर करण्यासाठी या योगासनाचा नियमितपणे सराव करा.

पवनमुक्तासनाचा नियमितपणे सराव केल्याने पोटाचे स्नायू आणि ओटीपोटाचा भाग ताणण्यास मदत होते. यासोबतच पचनसंस्थेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरते.

Yoga For Acidity
Rules of Yoga : योगा करतायं? मग जाणून घ्या ‘हे’ महत्वाचे नियम

वज्रासन

हे असे एकमेव योगासन आहे, जे आपण जेवण झाल्यानंतर आणि रिकाम्या पोटी देखील करू शकतो. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी वज्रासन लाभदायी आहे. हे योगासन पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हे योगासन आपले पोट आणि आतड्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे काम करते.

या योगासनामुळे, पचनाचे कार्य सुरळीत पार पडते. त्यामुळे, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि अपचनाच्या समस्या दूर करण्यासाठी हे योगासन मदत करते. त्यामुळे, हे योगासन नियमितपणे करा.

Yoga For Acidity
Benefits of Face Yoga : चेहऱ्यावरील फॅट्स कमी करण्यासाठी रोज करा फेस योगा;जाणून घ्या ‘हे’ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com