Parenting Tips : मुलांच्या परीक्षा संपल्या?अशा पद्धतीने जोपासा त्यांचे छंद, मुलांचे रमेल मन

Parenting Tips : सुट्टीत मुले सतत खेळत राहिल्यामुळे पालकांना चिंता सतावत असते. मुलांच्या सुट्टीचा हा वेळ त्यांनी कुठेतरी कारणी लावावा, असे पालकांना वाटत असते.
Parenting Tips
Parenting Tipsesakal

Parenting Tips : सर्वसाधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनेक मुलांच्या परीक्षा संपतात किंवा संपत आलेल्या असतात. या परीक्षा संपल्या की एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच मुलांना सुट्ट्या लागतात. या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत पुढील अभ्यास किंवा कोणताही क्लास नसतो. शिवाय, पुढील वर्गाची चिंता देखील सतावत नाही. थोडक्यात हा वेळ मुलांच्या विश्रांतीसाठी चांगला असतो. या सुट्टीत मुले त्यांच्या आवडीप्रमाणे वेळ घालवतात आणि दिवसभर खेळत राहतात.

मात्र, मुले सतत खेळत राहिल्यामुळे पालकांना चिंता सतावत असते. मुलांच्या सुट्टीचा हा वेळ त्यांनी कुठेतरी कारणी लावावा असे पालकांना वाटत असते. या सुट्टीचा सदुपयोग करून मुलांनी काही वेळ चांगल्या गोष्टींमध्ये द्यावा असे पालकांना वाटते. या सुट्ट्तील वेळेचा मुले आनंदाने उपयोग करून घेतील यासाठी पालकांनी काय करावे? त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांचा सतत मूड बदलतोय? मग, 'या' पद्धतीने करा हॅंडल

मुलांचे छंद जोपासा

प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतात. लहान मुलांनाही विविध प्रकारचे छंद असतात. काही मुलांना चित्रकला आवडते, काही मुलांना नृत्य आवडते, काही मुलांना अभिनयाची आवड असते तर काही मुलांना पोहायला आवडते. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करा. मुलांच्या आवडत्या छंदाचा क्लास लावता येतो का? ते पाहा. आजकाल ८ दिवस १५ दिवसांचे देखील क्लास उपलब्ध असतात. (children's hobbies)

निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा

रोजचे तेच कंटाळवाणे रूटीन, अभ्यास, क्लास आणि शाळा यामुळे मुले बोअर झालेली असतात. त्यासाठी, सुट्टीत तुम्ही मुलांना घेऊन फिरायला जाऊ शकता. खास करून मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा. निसर्गासोबत मुलांना कनेक्ट करा. यामुळे, मुलांना छान वाटेल. शिवाय, निसर्गात आल्यामुळे, त्यांचे मन देखील रमेल.

मुलांना विविध प्रकारची झाडे, फुलपाखरे, पक्षी, पहाटेचा सुर्योदय दाखवा, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकवा. या सर्व गोष्टी कदाचित तुम्हाला शुल्लक वाटतील. परंतु, निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या या वेळेचा परिणाम लहान मुलांच्या सर्वांगीण विकासावर होतो. (Go for a nature walk)

मुलांना समर कॅम्पला पाठवा

तुमच्या मुलांना एखाद्या विषयाची आवडत असेल किंवा त्यात रूची असेल तर, त्यासाठी एखाद्या समर कॅम्पची निवड करा. या समर कॅम्पला जाण्यासाठी तुमचा मुलगा किंवा मुलगी तयार आहे का? ते पाहा. किती दिवसांचा समर कॅम्प जॉईन करायचा? हे मुलांशी चर्चा करून ठरवा. या समर कॅम्पमुळे मुलांना छान गोष्टी शिकायला मिळतील आणि याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल. (summer camp)

Parenting Tips
Parenting Tips : मुले इतरांशी उद्धटपणे वागतात? मग, ‘या’ टिप्सच्या मदतीने करा सुधारणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com