Goa Tour: नववर्षात गोव्याला जायचा प्लॅन आहे? तिकिटापासून ते पर्यटन स्थळांपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

ख्रिसमस, नववर्षात गोव्याला जायचा तुमचा प्लॅन असल्यास, त्याआधी तिकिटापासून ते पर्यटन स्थळांपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Goa
GoaSakal

Goa Trip Guide: ख्रिसमस, नववर्षात अनेकजण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात. लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांमुळे अनेकांचा मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत बाहेर जाण्याचा विचार असतो. तुम्ही देखील या काळात बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर गोवा चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही गोव्यात ख्रिसमस आणि नववर्ष अगदी धुमधडाक्यात साजरे करू शकता. गोव्याला जायचा प्लॅन असेल, तर आधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

दिल्लीपासून गोवा जवळपास १८०० किमी लांब आहे. तर मुंबई-पुण्यासाठी हे अंतर फक्त ५०० किमी आहे. त्यामुळे तुम्ही काही तासात सहज गोवा गाठू शकता. गोव्याला जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे, विमान, कार अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, यासाठी तुम्हाला आधीच बुकिंग करावे लागेल. अन्यथा ऐनवेळी समस्या निर्माण होऊ शकते.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

दिल्ली ते गोवा कसा कराल प्रवास?

दिल्ली ते गोवा तुम्ही बस,रेल्वे आणि विमाने जाऊ शकतो. आयआरसीटीसीवरून तुम्ही रेल्वे तिकीट सहज बूक करू शकता. दिल्ली ते गोवा रेल्वे तिकीटासाठी तुम्हाला जवळपास २ हजार रुपये खर्च येईल. तुम्ही मुंबई, पुण्याने बाय-रोड देखील जाऊ शकता. रेल्वेने गेल्यावरही तुम्हाला कमी खर्च येईल.

Goa
Oxidised Jewellery Fashion : प्रत्येक लूक खुलवणारे ट्रेंडी ऑक्साइड झुमके

गोव्यात कोणत्या ठिकाणांना भेट द्याल?

गोव्यात पाहण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. पालोलेम बीच, बागा बीच, अगुआडा किल्ला, अंजुना बीच, टीटो नाईटक्लब सारख्या अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देखील तुम्हाला अनेक चांगली ठिकाणं मिळतील. तुम्ही ज्या ठिकाणांना भेट देणार आहात, तेथे आधीच राहण्याची व्यवस्था करा. तुम्ही जर उशीरा हॉटेल बुकिंग केल्यास अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात.

नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या गोव्यात तुम्हाला चविष्ट जेवणांचा देखील आनंद घेता येईल. नॉन-व्हेज खात असाल तर अनेक पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. शाकाहारी लोक देखील स्ट्रीट फूड्सचा आनंद घेऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com