Trekking in Jammu-Kashmir : ट्रेकिंगला जायचा विचार करताय? जम्मू-काश्मीरमधील हे ठिकाण आहे बेस्ट

जम्मू-काश्मीरमधील हे ठिकाण ट्रेकिंगसाठी आहे बेस्ट...
Trekking in Jammu-Kashmir : ट्रेकिंगला जायचा विचार करताय? जम्मू-काश्मीरमधील हे ठिकाण आहे बेस्ट

प्रत्येकाला हिवाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते, कारण प्रत्येकाला इथल्या सुंदर दृश्यांचा आणि थंड हवेचा आनंद घ्यायला आवडतो. दिल्लीहून हिमाचल किंवा उत्तराखंडमध्ये पोहोचणे सोपे आहे, पण काश्मीर एक्स्प्लोर केलं तर बरं होईल.

हिमालयाच्या कुशीत वसलेले जम्मू-काश्मीर हे भारताचे नंदनवन मानले जाते. इथल्या प्रत्येक ठिकाणाची स्वतःची खासियत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ठिकाणी भेट देणे सोपे नाही, परंतु जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल तर पहलगाम एकदा नक्की पहा.

पहलगाममध्ये बर्फाच्छादित पर्वत, गवताचं मैदान, तलाव, धबधबे आणि वाहणाऱ्या नद्या पहलगामच्या सौंदर्यात भर घालतात. बर्फवृष्टीदरम्यान या ठिकाणचे सौंदर्य शिखरावर असते. त्यामुळे बहुतांश पर्यटक बर्फवृष्टीदरम्यान येथे पोहोचतात.

Trekking in Jammu-Kashmir : ट्रेकिंगला जायचा विचार करताय? जम्मू-काश्मीरमधील हे ठिकाण आहे बेस्ट
Butterfly Park : एकाच ठिकाणी पाहता येणार शेकडो फुलपाखरं; 'या' ठिकाणी सुरू झालं खास बटरफ्लाय पार्क! वाचा सविस्तर

बेताब व्हॅली

पहलगाममध्ये बेताब व्हॅली आहे, ज्याला हजन व्हॅली असेही म्हणतात. हे ठिकाण पहलगामपासून 15 किमी अंतरावर आहे, जिथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. असे म्हटले जाते की 1983 मध्ये बेताब चित्रपटाचे शूटिंग येथे झाले होते, ज्यामध्ये सनी देओल आणि अमृता सिंह मुख्य भूमिकेत होते.

हे ठिकाण इतकं लोकप्रिय झालं की त्याला चित्रपटाचं नाव देण्यात आलं. जर तुम्ही पहलगामला जात असाल तर हे ठिकाण नक्की पहा. येथे तुम्ही अरु व्हॅली, ममलेश्वर मंदिर, शेषनाग तलाव इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची योजना करू शकता.

चंदनवाडी

ही व्हॅली पहलगामच्या बाहेरील काठावर वसलेली आहे. हे पहलगामपासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. येथे तलाव, धबधबे आणि सुंदर बर्फाच्छादित पर्वत आहेत. अनेकजण येथे हनिमून प्लॅन करतात.

मात्र, चंदनवाडीचे सौंदर्य संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये प्रसिद्ध आहे. शिवाय याला धार्मिक महत्त्वही आहे. असे म्हटले जाते की, हे एक पर्यटन स्थळ आहे जिथून अमरनाथ यात्रा सुरू होते. त्यामुळे चंदनवाडी पर्यटकांसाठीही खास आहे.

ममलेश्वर मंदिर

जेव्हा तुम्ही पहलगामला भेट द्याल तेव्हा धार्मिक स्थळ एक्सप्लोर करायला विसरू नका. येथे अनेक धार्मिक स्थळे असली तरी ममलेश्वर मंदिरात गेल्यास बरे होईल. हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की येथे भगवान शिवाची पूजा केली जाते. हे मंदिर मामाळ गावात असलेल्या कोलाहोई ग्लेशियरमधून निघणाऱ्या ओढ्याजवळ आहे.

पहलगाम इथून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. इतिहासानुसार, मूळ मंदिर चौथ्या शतकात बांधले गेले असे सांगितले जाते. राजा जयसिंहाने बाराव्या शतकात मामलका गावात हे मंदिर पुन्हा बांधले.

अरु व्हॅली

काश्मीरमधील प्रत्येक ठिकाण उत्तम असले तरी तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर अरु व्हॅलीला एकदा नक्की भेट द्या. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com