esakal | होम डेकोरेटसाठी या 'तीन' सोप्या टिप्सचा करा वापर; बनवा घर कलरफुल
sakal

बोलून बातमी शोधा

होम डेकोरेटसाठी या  'तीन' सोप्या टिप्सचा करा वापर

होम डेकोरेटसाठी या 'तीन' सोप्या टिप्सचा करा वापर

sakal_logo
By
अर्चना बनगे

या गोष्टीत काहीच शंका नाही की, रंग तुमच्या घराला झटपट नविन उर्मी देतात. खासकरून तुम्ही काही काळाने घरी येता. तेव्हा हेच रंग तुमचे स्वागत करतात. तर चला तुम्हाला तीन सोप्या आणि झटपट ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे आपले घर अधिक कलरफुल (Home Décor)आणि रंगीत बनवू शकाल. कारण घरी येताच तुमचा मुड चांगला होईलच आणि सगळी चिंता आणि थकवा दूर होईल.आपल्या घराला डेकोरेट आणि नविन ताजगी देण्यासाठी एका भिंतीची निवड करा. ज्याला तुम्ही हाइलाइट करू शकाल. त्याला उज्ज्वल रंगाने रंगवा, जेणेकरून प्रत्येकाचे लक्ष त्याचकडे जाईल. आपण घराची दारे आणि खिडक्या, (Wall Décor, Wall Color, Highlighted Wall)चौकटी आकर्षक रंगांनी रंगवू शकता. अगदी स्वस्तात जुन्या घरातील फर्निचरला पेस्टल किंवा ट्रेंडी रंगाने रंगविल्यास इंटीरियर देखील नवीन दिसेल.(three-simple-and-fun-ways-to-add-colours-to-your-home-dcor)

कामाचा सल्ला: रंग जास्त प्रमाणात देऊ नका. म्हणजेच, जास्तीत जास्त फक्त एक किंवा दोनच रंग वापरा. जादा रंग निवडल्यामुळे आपले घर कमी तर घरात इंद्रधनुष्य अधिक दिसतील. जे बाहेरील बघणाऱ्यांच्या डोळ्यांना दिलासा देणार नाही.

घराचे जुने पडदे बदला: पडदे बदलताना, नवीन पडद्याचा रंग आणि त्याची प्रिंट जुन्यापेक्षा वेगळी ठेवा. यामुळे घर वेगळे दिसेल. याशिवाय घराचे रग्स ही बदला. अशा प्रकारे आपण घरातील फर्निचरमध्ये जास्त बदल न करता एक रीफ्रेश लुक देऊ शकता.

जर तुमच्याकडे थोडे अधिक बजेट असेल तर आपण फर्निचरच्या रंगात आणि त्यातील इतर वस्तूंमध्ये काही बदल करू शकता. नवीन फर्निचरच्या वस्तूंचे रंग, नमुने आणि पोत पूर्वीपेक्षा भिन्न असल्यास चांगले होईल.

जर तुम्हाला घराच्या भिंतींच्या रंगाचा प्रयोग करण्याचा किंवा पडदे बदलण्याच्या मनःस्थितीत नसाल तर आपल्याला घरात काही नवीन आणि रंगीबेरंगी सामानांची एन्ट्री केली पाहिजे. जसे की, थ्रो पिलोज़, रंगीत कवरची पुस्तके सजवून ठेवा. ट्रेंडी ट्रेज़ आणि कोस्टर्स, फ्रूट बाउल्स, कॉफ़ी टेबल बुक्स याचा वापर करू शकता. घराच्या साइड टेबल्सवर सुंदर साइड शोपीस,वाज़, कैंडल्स इत्यादी ठेवल्या जाऊ शकतात.

जर आपले घर खूप मोठे असेल तर आपण मोठी पेंटिंग्स लावू शकता. एका मोठ्या पेंटिंगमुळे संपूर्ण खोलीचे स्वरूप बदलते. छोट्या खोल्यांमध्ये लहान पेंटिंग किंवा फ़ोटोग्राफ़्स लावा. याशिवाय आपण खोलीत अनेक इनडोर प्लांट्स लावू शकता. ज्यामुळे घरात हिरव्या रंगाची नैसर्गिकरित्या भर पडेल. आपण इतर रंगांच्या वनस्पतींने देखील घर सजवू शकतो.