Healthy Tips: पक्षाघात, हृदयविकाराचे वय येतेय अलीकडे; वेळीवर उपचाराने रूग्ण होतात बरे

Healthy Tips: एखादा पदार्थ तळण्यासाठी घेतलेल्या खाद्यतेलाचा वापर परत दुसरा कुठला पदार्थ करण्यासाठी केला जाऊ नये; कारण यातील अनसॅच्युटेड फॅट असते जे पचत नाही.
Healthy Tips:
Healthy Tips: Sakal
Updated on

Healthy Tips: विविध कारणाने पक्षाघात किंवा हृदयविकार होण्याचे वय अलीकडे आले. पूर्वी ५५ ते ६० या वयात पक्षाघात किंवा हृदयविकार होत होता. आता मात्र वीस ते पंचवीस वर्षे वयाचेदेखील रुग्ण आढळतात. परंतु, पूर्वीपेक्षा अधिक चांगले उपचार उपलब्ध असल्याने या आजारात रुग्ण ठणठणीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मत, न्यूरोलॉजिस्ट डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केले.

ते म्हणाले, बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यात बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन, तंबाखू किंवा अल्कोहोलचे व्यसन यामुळे हल्ली पक्षाघात आणि हृदयविकार हा वृद्धांमध्ये दिसणारा आजार आता तरुणांमध्येही दिसायला लागला आहे. सध्या २० ते २५ वयोगटातील रुग्णदेखील या आजाराचे आढळतात. विशेष म्हणजे सगळ्या तपासण्या नॉर्मल असतानाही अचानकपणे असे आजार तरुणांना जडत आहेत. हे आजार टाळण्यासाठी जंक फूड-फास्ट फूडचे सेवन टाळावे, नियमित किमान सात तास झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट त्यासाठी मैदानी खेळ जोपासावे, योगा, ध्यान, प्राणायाम यांचा जीवनशैलीत समावेश करावा. रोज वेगात वीस मिनिटे पायी चालणे सर्वोत्तम व्यायाम समजला जात असल्याचेही ते म्हणाले.

तेलाचा वापर पुन्हा नको

एखादा पदार्थ तळण्यासाठी घेतलेल्या खाद्यतेलाचा वापर परत दुसरा कुठला पदार्थ करण्यासाठी केला जाऊ नये; कारण यातील अनसॅच्युटेड फॅट असते जे पचत नाही. त्यामुळे वारंवार एकाच तेलाचा वापर पदार्थ तळण्यासाठी करू नये. यासह आहारात साखर, मीठ, मांसाहार याचा वापर प्रमाणात करावा. तेलाचा विचार केल्यास सूर्यफूल, करडई तेल खाण्यासाठी उत्तम आहे किंवा राइस ब्रान तेलाचाही वापर करू शकता. शक्यतो नैसर्गिकरीत्या तयार केलेले तेल चांगले असते.

Healthy Tips:
Moong Daal: वजन राहील नियंत्रणात, फक्त मुग डाळीचे 'असे' करा सेवन

पहिला तास महत्त्वाचा

हातापायाची शक्ती कमी होणे, अचानक बोलायला त्रास होणे, चेहरा वाकडा होणे, ही पक्षाघाताची लक्षणे आहेत. पक्षाघात आल्यानंतर पहिला तास म्हणजे त्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात. या तासाभरात रुग्णाला औषधोपचार मिळाले तर तो लवकर ठणठणीत होतो आणि आपले सामान्य आयुष्य जगू शकतो पुढेही त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या आणि दीर्घकाळ औषधी घ्यावी लागतात. यामुळे नंतरचा धोका टळतो.

पंधरा टक्के रुग्णांत फाटतात रक्तवाहिन्या

पक्षाघात झालेल्यांमध्ये मेंदूत गुठळ्या, अंतर्गत रक्तस्राव असे प्रकार आढळतात. यात ८५ टक्के रुग्णांमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्यांत गुठळ्या असल्याचे प्रकार समोर येतात, तर पंधरा टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी फाटणे किंवा रक्तस्राव असल्याचे समोर येते.

Healthy Tips:
Video: मावा, तूप, मिठाई खाऊन पडू शकता आजारी, घरी 'अशा' पद्धतीने ओळखा भेसळयुक्त पदार्थ

मेंदूच्या रक्तवाहिन्यांची अँजिओप्लास्टी

उपचारांमध्ये आता हृदयाप्रमाणेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांची अँजिओप्लास्टी ही नवी उपचार पद्धत विकसित झाली. या पद्धतीने आजवर साडेसहाशे पेक्षा अधिक शस्त्रक्रिया मी स्वतः केल्या आहेत. यात रुग्णाच्या अवयवाच्या हालचाली पूर्ववत होण्याचा कालावधी देखील कमी झाला आहे. यात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील आम्ही यशस्वी केल्या असल्याचेही डॉ. वट्टमवार म्हणाले.

अतिव्यायाम नको

सध्या जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत त्यांना विचारले असता, शरीरासाठी अतिव्यायाम धोकादायक असतो. त्यामुळे जिममध्ये जाताना स्टेप बाय स्टेप व्यायाम करावा. नंतर हळूहळू या व्यायामात वाढ करावी. झोप अपुरी ठेवून जिमला जाणे टाळावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच योग्य व्यायाम करावा, असेही डॉ. वट्टमवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com