Winter Tips: जुन्या फाटक्या स्वेटरचा करा असा उपयोग

Tips on how to use an old torn sweater- आपल्याकडे जुने किंवा फाटलेले स्वेटर्स असतात, जे अजिबात वापरले जात नाहीत. त्यांचा आपण योग्य वापरू करू शकतो.
Tips on how to use an old torn sweater
Tips on how to use an old torn sweateresakal

Tips to use old Sweater: हिवाळा Winter सुरू आहे. हिवाळ्यामध्ये थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण स्वेटर sweaters वापरतो. बऱ्याचदा आपल्याकडे एकापेक्षा जास्त स्वेटर्स असतात, जे अजिबात वापरले जात नाहीत. अशा वेळी आपल्याला वाटतं की स्वेटर फेकून द्यावा किंवा मग दुसऱ्याला वापरायला द्यावा. अनेकवेळा जुने स्वेटर फाटायला लागतात, त्यानंतर आपण ते वापरणे बंद करतो. हे स्वेटर आपण एकतर फेकून देण्याचा विचार करतो किंवा गुंडाळून बॉक्समध्ये पॅक करतो. तुम्हीही तुमच्या जुन्या स्वेटर्ससोबत हीच पद्धत वापरत असाल, तर आम्ही दिलेल्या या टिप्स फॉलो करून तुम्ही त्यांचा पुन्हा वापर करू शकता. तुमच्या दैनंदिन घरातील कामांमध्येही या पद्धती उपयुक्त ठरू शकतात.

जुने फाटलेले स्वेटर असे वापरा (Use old torn sweaters like this)-

1. उशी कव्हर (Pillow covers)-

जुन्या स्वेटरचा उत्तम वापर म्हणजे तुम्ही त्यापासून पिलो कव्हर्स बनवू शकता, जे तुमच्या सोफा, कामाची खुर्ची किंवा बेडरूमसाठी योग्य असू शकते. स्वेटर किती मोठा आहे आणि कुशनचा आकार यावर किती कुशन बनतील हे तुम्हाला ठरवता येईल.

2. बूट टॉपर्स (Boot toppers)-

अनेकदा बुटांमुळे पाय चिरतात किंवा जखमी होतात. यामागील कारण म्हणजे बुटांच्या रबरी टॉपचा कडकपणा, ज्यामुळे पायाला जखमा होतात. तुम्ही तुमच्या जुन्या स्वेटरच्या मदतीने बूट टॉपर्स बनवू शकता, ज्याचा वापर तुमचे पाय गरम करण्यासाठी तसेच स्टायलिश दिसण्यासाठी करता येईल.

3. कप वार्मर (Cup Warmer)-

तुम्ही तुमच्या जुन्या स्वेटरमधून कप वॉर्मर बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या स्वेटरच्या स्लीव्हजला गोलाकार आकारात लहान भागांमध्ये कापू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कपसाठी कप वार्मर करू शकता. त्यामुळे आतील द्रव उबदार राहिलच शिवाय खूप गरम कप उचलण्यास मदतही करेल. त्यातून तुम्ही काचेचे आवरणही बनवू शकता.

4. खुर्चीसाठी वार्मर (Chair Warmer)-

तुम्ही असा जुना स्वेटर कापून प्लास्टिकच्या खुर्चीवर किंवा तुमच्या कामाच्या खुर्चीवर ठेवू शकता. अतिरिक्त थंडीच्या दिवसात ते खूप आरामदायक असेल. हिवाळ्यात खुर्च्या जास्त थंड होतात, त्यामुळे अनेक वेळा त्रास होतो. त्यावर स्वेटर असेल तर फारशी थंडी जाणवणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com