Physical Relation : या गोष्टींची काळजी घेतलीत तर शारीरिक संबंध होतील आनंददायी

एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा मूड बिघडतो आणि या मूड डिसऑर्डरमुळे सेक्स करताना तुमच्या कमालीच्या आनंदावरही परिणाम होतो.
Physical Relation
Physical Relation google

मुंबई : अनेकदा आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या नात्यावर विशेष परिणाम होतो. बऱ्याचदा असे घडते की, लैंगिक संबंध ठेवताना आपल्या जोडीदाराची चिडचिड होते त्याचे प्रमुख कारण आपण केलेल्या चुका.

एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा मूड बिघडतो आणि या मूड डिसऑर्डरमुळे सेक्स करताना तुमच्या कमालीच्या आनंदावरही परिणाम होतो. जरी तुम्ही पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवणार असाल आणि तरीही तुम्हाला सेक्स करताना ऑर्गेझम येत नसेल तर काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

Physical Relation
Physical Relation : लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी केलेली ही कृती ठरेल धोकादायक

तुम्ही तुमच्या जोडीदारावर कितीही प्रेम करता, पण जर तुमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणाने चर्चा होत नसेल, तर समजून घ्या की, तुम्हाला हवा तसा आनंद मिळणार नाही, ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. म्हणूनच तुमच्या पार्टनरसोबत सेक्स करताना या गोष्टी लक्षात ठेवा, ज्यामुळे तुमचे नाते खूप मजबूत होईल.

1. जोडीदाराला द्या संकेत

जर तुम्ही अचानक तुमचा मूड बदलला आणि तुमच्या जोडीदाराला शारिरीकरित्या सहभागी करून घ्यायचे असेल तर एक किंवा दोघांनाही त्याचा आनंद मिळणार नाही हे नक्की. म्हणून, जेव्हाही तुमचा मूड असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला ते कोणत्याही स्वरूपात सूचित केले पाहिजे.

यामुळे तुमचा पार्टनरही मानसिकदृष्ट्या तयार होईल आणि बेडवर तुमच्यासोबत मनमोकळेपणाने याचा आनंद घेईल. सेक्स हे पूर्णपणे मानसिकरित्या जोडलेले असते त्यामुळे तुमच्या जोडीदाराचा मूड तुमच्या मूडशी देखील संबंधित आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिकपणे, बॅड टॉक्स किंवा हातवारेद्वारे करुन कोणत्याही प्रकारे संकेत दिले पाहिजेत.

Physical Relation
Physical Relation : एकत्र कुटुंबात राहतानाही लैंगिक जीवनाचे खासगीपण कसे जपाल ?

2. मनाला उत्तेजित करा

लैंगिक संबंधाची सुरुवात मनापासून होते. म्हणून कामुक वाचा किंवा सेक्सबद्दल कल्पना करा. लैंगिक संबंधाच्या संवेदना सुधारण्याचे हे एक अद्भुत काम करू शकते. हे लैंगिक अनुभव सुधारण्यास देखील मदत करेल.

3. फोर प्ले करा

जर कोणत्याही सेक्सची सुरुवात फोर प्लेने होत असेल तर समजून घ्या की तुम्हाला नक्कीच कामोत्तेजना मिळेल. रोमँटिक मूड तयार करण्यासाठी, तुम्ही संगीताची मदत घेऊ शकता किंवा तुमच्या जोडीदाराला विशेष पेय देऊन भुरळ घालू शकता. रोमान्स, कॉमेडी किंवा एकत्र चित्रपट पहा व मूड बनवा

4. कंडोमचा वापर करा

सुरक्षित लैंगिक क्रिया खूप महत्त्वाचा आहे आणि यासाठी तुम्हाला कंडोम वापरणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी जेव्हा आपल्या व जोडीदाराच्या मनात लैंगिक संबंधाचा विचार येतो तेव्हा आपल्या जवळ कंडोम ठेवायला विसरु नका.

5. जोडीदाराचाही विचार करा

जर तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर फक्त तुमच्या आनंदाचा विचार करू नका. जोडीदाराच्या समाधानाची आणि आनंदाची काळजी घ्या. यामुळे तुम्हाला आध्यात्मिक समाधानही मिळेल.

6. रोमँटिक क्षण अनुभवा

शरीर संबंध ठेवताना तुम्ही तुमचे रोमँटिक क्षण आठवायला हवे तसेच सेक्सनंतर तुम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली पाहिजे आणि तुमचे रोमँटिक क्षण बराच काळ अनुभवले पाहिजेत. संशोधन असे सांगते की, यामुळे तुमच्या दोघांमधील नाते पुन्हा नव्याने फुलेल आणि तुम्हाला अधिक आनंद मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com