
How to remove houseflies in rainy season: पावसाळा आला की माशांचा त्रास सर्वात जास्त वाढतो. तुम्ही घराचे दरवाजे आणि खिडक्या कितीही बंद ठेवल्या तरी त्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरात प्रवेश करतात. या माश्यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करावे लागते. माश्या या स्वयंपाकघरात जास्त दिसतात आणि प्रत्येक खाद्यपदार्थावर आणि ठिकाणी बसून त्यांना दूषित करतात. माश्या प्रत्येक वस्तूवर बसतात, अशावेळी घाण त्यांच्या पायांना चिकटते आणि ते खराब करतात. त्यामुळे या माशांना स्वयंपाकघरातून हाकलून लावणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.