
Night Sweats in November: घाम येणं गरजेचं आहे, पण जर घाम विनाकारण येत असेल तर ते चिंतेचं कारण असू शकते. उन्हाळ्यात शरीर थंड राहावे म्हणून आपल्याला जास्त घाम येतो. पण हिवाळ्यात हवामान थंड असते व हवा गार असते, त्यामुळे आपल्याला घाम येण्याचे प्रमाण कमी असते.
या काळात जर आपण काही शारीरिक हालचाली करत असू जसे की, व्यायाम करणे किंवा काही शारीरिक बल लागणारे काम करणे, तरच आपल्याला अशा हवामानात जास्त घाम येऊ शकतो. याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीनुसारही घाम येण्याचे प्रमाण कमी जास्त असते. परंतु हिवाळ्यात जर रात्री झोपेत जास्त घाम येत असेल तर ते आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. काय आहेत यामागील करणे व उपाय, जाणून घेऊया...