Businesses: गृहिणी महिला घरच्या घरी करु शकतील असे टॉप 5 खास लघु उद्योग...

घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करण्याऱ्या महिलांसाठी लघुउद्योग हा बेस्ट पर्याय असतो.
Businesses
BusinessesEsakal

महिलांना नेहमीच घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करावं लागतं. मुळातच हुशार आणि नियोजनात परफेक्ट असल्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय महिला कोणत्याही गोष्टीत परफेक्ट असताच. पण असं असलं तरी त्यांना कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी दूर सारता येत नाही. लग्नानंतर अथवा मुल झाल्यावर नोकरी अथवा पूर्णवेळ व्यवसाय करण्यावर अनेक बंधने येतात. कामाची वेळ आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे महिलांसाठी नेहमीच तारेवरची कसरत असते. अशा वेळी पूर्णवेळ नोकरी अथवा व्यवसाय करण्यापेक्षा महिलांसाठी एखादा घरगुती व्यवसाय सुरु करणं जास्त सोयीचं असतं. कारण घरगुती व्यवसासाठी महिला सहज वेळेचं व्यवस्थापन करू शकतात. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करण्याऱ्या महिलांसाठी गहउद्योग हा बेस्ट पर्याय असतो. म्हणूनच आम्ही अशा सर्व महिलांसाठी खास पाच घरघुती गृह उद्योगाची माहिती आज आपण पाहणार आहोत.

1) द्रोण पत्रावळी घरघुती उद्योग:

पळसाच्या पाना पासून द्रोण -भारत देश मध्ये पळसाच्या पाना पासून अनेक वर्षा पासून पत्रावळी /द्रोण बनण्यात येत आहेत. आधुनिकीकरण मुळे पत्रावळी ची जागा पेपर डिश ने घेतली आहे .वापरा आणि फेकून नष्ट करा आणि निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवा. या मुळे पत्रावळी आणि द्रोण यांचा उपयोग सर्व ठिकाणी आढळून येतो. त्यामुळे तुम्हाला या घरघुती उद्योग बऱ्या पैकी कमाई करता येईल.

2) कापडी पिशव्या घरघुती उद्योग:

1 ते 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे खास कौशल्याची गरज नाहीय. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय केलात तर खर्च वाढेल, पण कमाई चांगली होईल. अर्थात, कमाई व्यवसाय कुठे करताय, तो किती मोठा आहे, यावर अवलंबून असते.

Businesses
Business : हा उद्योग सुरू करा; सरकार देईल लाखोंचे भांडवल

3) कागदी पिशव्या घरघुती उद्योग:

समाजातील बहुतेक सर्व क्षेत्र कागदी पिशव्या वापरतात आणि प्रत्येकासाठी वास्तविक वापर किंवा हेतू भिन्न असतो. कागदी पिशव्या अगदी वैद्यकीय वस्तू पॅक करण्यासाठी वापरल्या जातात. येथे, उत्पादन करताना आपल्याला गुणवत्तेची मानके आणि स्वच्छता तपासणे आवश्यक आहे. हाच नियम खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी कागदाच्या पिशव्यांसाठी आहे.खाद्यपदार्थांच्या कागदाच्या पिशव्या तयार करताना मोठ्या प्रमाणात जोखमीचा सहभाग असतो. वापरल्या गेलेल्या विषारी पदार्थांचा अवांछित घटनेत अंत होऊ शकतो. अशा प्रकारे, उत्पादनासाठी योग्य पद्धती निवडा आणि पिशव्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करा. विशेषीकरण घेतल्यास, आपल्याकडे सर्व पेपर बॅगचे मिश्रण असू शकते किंवा विशिष्ट उद्योगांसाठी कागदी पिशव्या तयार करण्यास आपण खास करू शकता.

4) पापड घरघुती उद्योग:

पापड उद्योग केला पाहिजे कारण सध्याच्या काळात बाजारात पापडला खूप मागणी आहे कारण आज अशी फॅशन झाली आहे की लोकांना मसूर आणि तांदळाबरोबर पापड खाणे आवडते आणि काही लोक असे लोणचे पापड खातात. अनेक लग्न आणि फंक्शन्समध्ये पापड देखील बनवला जातो, त्यामुळे पापडची मागणी खूप जास्त आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला त्यात खूप गुंतवणूक करण्याची गरज नाही, तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू करू शकता, जरी एखाद्या स्त्रीला हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ती तिच्या घरातून अगदी सहजपणे सुरू करू शकते.

5) मसाला घरघुती उद्योग:

मसाला उद्योग म्हणजे सर्व कच्चे मसाले घेऊन त्यांची एकत्र पावडर तयार करून बाजारात विकणे. जेणेकरून स्वयंपाक करताना सर्व मसाल्यांचा अगदी सहज वापर होईल. पूर्वी बायका सर्व कच्चे मसाले घरी आणून त्यांना बारीक कुटून एकत्र करून मसाला बनवत असत. पण कालांतराने आता एवढा कोणाला वेळ राहिलेला नाही,म्हणून तुुमचा मसाला उद्योग व्यवसाय चांगला चालु शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com