Monsoon skincare routine for oily skin
Sakal
लाइफस्टाइल
Oily Skin Care: पावसाळ्यात तेलकट त्वचेवर काय लावावे? चमकदार त्वचा मिळविण्यासाठी 'हे' 5 उपाय नक्की करा
पावसाळ्यात त्वचेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे असते. या काळात तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
Summary
पावसाळ्यात तेलकट त्वचेसाठी मऊ फेसवॉशने दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा.
नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा जे त्वचेला हायड्रेट ठेवते पण तेलकटपणा वाढवत नाही.
मुलतानी माती किंवा हळदीचा फेसमास्क आठवड्यातून एकदा लावून त्वचा चमकदार करा.
Monsoon skincare routine for oily skin: पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. आर्द्रतेमुळे त्वचेवरील सेबम म्हणजेच तेलाचे उत्पादन वाढते. यामुळे त्वचा तेलकट होते. त्वचा चिकट आणि तेलकट दिसू लागते. इतकेच नाही तर जास्त आर्द्रतेमुळे छिद्रे देखील बंद होतात. यामुळे मुरुम आणि फोडांची समस्या निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही घरी त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता. घरी असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही तेलकट त्वचेपासून मुक्त होऊ शकता.