
संक्रांती सजावट कल्पना 2025: दरवर्षी जानेवारीमध्ये मकर संक्राती साजरी केली जाते. यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतातील विविध भागात हा सण स्थानिक मान्यतेनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रातीला दान करणे शुभ मानलं जातं.
तसेच या दिवशी तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला असे बोलून हातावर तीळ गूळ देतात आणि मकर संक्रातीच्या शुभेच्छा देतात. या दिवशी महिला सुंदर पारंपारिक पद्धतीने तयार होतात. तसेच घराची सुंदर सजावट करतात. तुम्हाला यंदा घराची पारंपारिक पद्धतीने सजावट करायची असेल तर पुढील कल्पनांची मदत घेऊ शकता.