
Ethnic wear for Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया हा एक शुभ मुहूर्त आहे. प्रत्येकजण या शुभ मुहूर्तावर नविन काम सुरू करतात. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. अशावेळी पारंपारिक पोशाख घालणे देखील खूप खास आहे. या दिवशी पारंपारिक साड्या परिधान करून महिला आपला लूक खास बनवतात. जर तुम्हालाही यंदा अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने खास दिसायचे असेल, तर रेड बनारसी साडी, गोल्डन यलो सिल्क साडी आणि ग्रीन सिल्क साडी असे पर्याय नक्कीच ट्राय करू शकता. हे रंग माता लक्ष्मीचे देखील प्रिय आहे.